धाराशिव:उमरगा तालुक्यातील एकुरगावाडी येथील युवकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा सुरेश बिराजदार यांच्या प्रमुख उपस्थितीत दि .५ रोजी प्रवेश संपन्न झाला . यावेळी लोहारा तालुकाध्यक्ष सुनील साळुंखे, राष्ट्रवादी युवक चे जिल्हा सरचिटणीस शमशोद्दीन जमादार , शहराध्यक्ष शंतनु सगर यांची प्रमुख उपस्थीती होती .
उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे हात बळकट करण्यासाठी तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवत युवकांनी संघटन उभे करून जनसामान्यांची सेवा करावी असे मत श्री बिराजदार यांनी बोलताना व्यक्त केले .
तालुक्यातील कोरेगाववाडी येथील २५ ते ३० युवकांचा यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश संपन्न झाला यात अक्षय कुंभार, दत्तु लवटे यांच्या नेतृत्वाखाली प्रवीण कुंभार ,अजित कुंभार ,विशाल कुंभार ,मुकेश सोनकांबळे, यशवंत कुंभार ,अक्षय हांडे, सुनील शेंडगे, निवृत्ती बोंडगे ,लक्ष्मण माने ,ईलाही शेख आधी सह कार्यकर्त्यांनी प्रवेश केला . यावेळी अजित पाटील , धीरज बेकंबकर, अनिल व्हंताळकर ,फैयाज पठाण, आधी सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
