छत्रपती संभाजीनगर

जगप्रसिद्ध अजिंठालेणी बघण्यासाठी दिल्ली येथील काही पर्यटक त्यांच्या नातेवाईकांसोबत अजिंठा लेणी बघण्यासाठी आले असता या अजिंठालेणी परिसरातील उद्यानातील सुंदर दृष्य बघुन फोटो काढत असताना फोटो काढण्याच्या नांदामधे मग्न असताना दिल्ली येथील साहेबा अन्सारी या महिलेचा i PHONE १४ याच उद्यानामधे हरवला असताना ही महिला खुप घाबलेली होती आणि सैरावैरा धावत होती मोबाईल चा खुप शोध घेऊन ही मोबाईल सापडत नव्हता त्यामुळे या महिलेणी फर्दापुर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी भरत कोळी हे या ठिकाणी ड्युटी करत असताना यांना हा प्रकार साहेबा अन्सारी यांनी सांगितला असता. व या प्रकरणी मदत मागितली असता पोलीस कर्मचारी भरत कोळी व ग्रामसुरक्षा दल चे सदस्य अयास शेख यांनी विचारपुस करत हरवलेल्या मोबाईल चा जलद गतीने शोध घेण्यास सुरुवात केली आणि तो मोबाईल त्यांना उद्यानामधे खाली पडलेल्या अवस्थेमधे मिळुन आला हा आय.फोन.१४ मिळताच त्यांनी प्रामाणिकपणे हा मोबाईल जगप्रसिद्ध अजिंठालेणी बघण्यासाठी आलेली दिल्ली येथील महिला पर्यटक साहेबा अन्सारी यांना या दोघांनी परत केला त्यावेळेस साहेबा अन्सारी यांनी फर्दापुर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी भरत कोळी आणि ग्रा.सु.द. सदस्य अयास शेख यांचे मनापासून आभार व्यक्त केले आणि खुप खुप धन्यवाद ही दिले

N TV न्युज मराठी रिपोर्टर जब्बार तडवी सोयगाव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *