यापूर्वी भादा येथील द्वितीय वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ रुद्रायणी पाटील यांचा करार दिनांक 15 ऑगस्ट 2024 रोजी एक वर्षीय शासनाकडून करार संपल्याने ही जागा रिक्त झाली होती. या जागेवर दि 10 सप्टेंबर 2024 रोजी लातूर जिल्ह्यातच आरोग्य सेवेत कार्यरत असणारे वैद्यकीय अधिकारी डॉ संतोष पाटील यांची नियुक्ती शासनाकडून नुकतीच करण्यात आलेली आहे.
यामुळे भादा येथील आयुष्यमान आरोग्य मंदिर … रुग्णालयामध्ये गेल्या अनेक वर्षापासून चांगल्या पद्धतीने रुग्णसेवा देणारे आणि वीस ते पंचवीस गावातील नागरिकांना चांगल्या पद्धतीने रुग्णसेवा देऊन औसा लातूर जाण्याऐवजी उपचार देण्याची किमया करणारे एक संवेदनशील व्यक्तिमत्व असणारे वैद्यकीय अधिकारी डॉ महेश पवार यांच्या जोडीला नियुक्तीवर नुकताच पदभार घेतलेले डॉ पाटील हे चांगल्या पद्धतीचे डॉक्टर असून त्यांनी यापूर्वीही प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये प्रतिनियुक्तीवर काम केले आहे… यामुळे त्यांना भादेकरांचा चांगला अनुभव असून ते या प्राथमिक आरोग्य केंद्रावरील रुग्णांना आरोग्य सेवा चांगल्या पद्धतीने मिळावी याकरिता प्रयत्न करतील आणि एकाच वैद्यकीय अधिकाऱ्यावर पडणारा ताण विभागला जाऊन भा दा येथील आरोग्य सेवा चांगल्या पद्धतीने सुरळीत चालेल याबाबत भादेकरांनी अपेक्षा व्यक्त केलेली आहे.
( )भादा येथे सध्या वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ महेश पवार हे कार्य करीत असून त्यांच्या जोडीला आपणही रुग्णांना चांगल्या पद्धतीने रुग्णसेवा देऊ अशी अपेक्षा यावेळी सदरील प्रतिनिधीशी बोलताना वैद्यकीय अधिकारी डॉ संतोष पाटील येळवटकर यांनी व्यक्त केली…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *