♦️महाविकास आघाडीच्या नेत्याच्या मनात काय आहे, यापेक्षा महायुतीचे सरकार सत्तेवर आणण्याचा ठाम निर्धार राज्यातील जनतेने केला आहे. सत्तेत येण्याचे स्वप्न पाहणाऱ्या महाविकास आघाडीचे अस्तित्व काही दिवसात संपुष्टात येईल, असा दावा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.

♦️प्रवरा उद्योग समूहाच्या गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेल्या मंत्री विखे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले, ” संगमनेर विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्याचा डॉ. सुजय विखे पाटील यांनी केलेल्या निर्णयावर भाष्य करताना मंत्री विखे पाटील म्हणाले, ”डॉ. सुजय निर्णय घ्यायला सक्षम आहे. त्याला जो निर्णय घ्यायचा, तो त्याने घ्यावा, आम्ही त्याच्या निर्णयासोबत असल्याचे त्यांनी सूचक भाष्य त्यांनी केले.”
