लोकशाहीसाठी मतदान करणे आवश्यक
फुलचंद भगत
वाशिम:-विधानसभेच्या निवडणुकीत १८ वर्षांवरील नोंदणी झालेल्या सर्व नागरिकांनी मतदान करणे आवश्यक आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधीत्व कायदा १९५१ मधील कलम १३५ (ब) नुसार मतदानाच्या दिवशी सर्व मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी सार्वजनिक सुट्टी दिली जाते. मात्र, बहुतेक लोक माझ्या एका मताने काय फरक पडतो? असा विचार करुन मतदान करीत नाहीत. पण, एका मताने जिंकलेला हरतो आणि हरलेला जिंकू शकतो, अशी अनेक उदाहरणे आहेत.
एक उमेदवार जिंकतो व बाकी दुसरा हरतो त्यामुळे मतदारांनो, एका मताची किंमत खूप काही आहे. त्यामुळे प्रत्येकाने मतदान करणे आवश्यक आहे.मतदान हा लोकशाहीचा अविभाज्य भाग आहे. प्रत्येकाला मतदानाचा अधिकार आहे, याचा अर्थ सर्व भारतीय त्यांच्या पसंतीच्या उमेदवाराला मतदान मतदानाची करु शकतात, मतदान करून समाजात बदल घडवू शकतात. मतदान करून भक्कम लोकशाही निर्माण करणे प्रत्येकांचे कर्तव्य आहे.टक्केवारी वाढण्यासाठी प्रशासनाकडून जनजागृतीही केली जात आहे.

मतदारांनो, एका-एका मताची किंमत ओळखा,मतदाम देशसेवेचा एक भाग
देशातील लोकशाहीमध्ये उद्योगपती कारखानदार, सेलिब्रिटी, सरकारी नोकरदार, सर्वसामान्य नागरिक, शेतकरी व शेतमजूर यांना मतदानाचा अधिकार असून, सर्वांच्या मताचे मूल्य सारखेच आहे. त्यामुळे मतदान करणेसुद्धा देशसेवेचाच एक भाग आहे. लोकशाही सुदृढ व सक्षम असेल, तर देशाच्या विविधांगी विकासाला चालना मिळण्यास, विकासाला गती येण्यास भरीव मदत होते. याच दृष्टीकोनातून या देशाचा नागरिक म्हणून प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क प्राधान्याने बजावणे गरजेचे आहे.

लोकशाहीला बाधा?
मी एकट्याने मतदान नाही केलं,
तर काय फरक पडतो. मतदानानिमित्त सुट्टी आहे, या सुट्टीचा आनंद घेऊ, कुठेतरी सहलीला जाऊ,किंवा शेतीतील कामे चालु आहेत जाऊद्या असा विचार म्हणजे लोकशाहीला बाधा निर्माण करणे होय, कारण थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीप्रमाणे एका-एका मतानेच मतांचा डोंगर उभा राहतो.त्यामुळे प्रतेकाने मतदान हे केलेच पाहिजे.