धर्माबाद (प्रतिनिधी):- परभणी येथे जेव्हा घटना घडली त्यावेळी, उपस्थितांनी संशयितास घटनास्थळी पकडून त्यास चोप देवून पोलिसांच्या ताब्यात दिले होते. या घटनेचे पडसाद परभणी बरोबरच धर्माबाद शहरातही बुधवारी उमटत डॉ. बाबासाहेब आंबेडकरी चळवळीतील नागरिक व भारतीय संविधान प्रेमी जनता डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक फुलेनगर येथे जमली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून निषेध मोर्चा मोठ्या प्रमाणावर बसवन्ना हिल्स, रामनगर चौक, वाल्मिकी चौक, आंध्रा बसस्थानक, नरेंद्र चौक, नेहरू चौक, पोलीस ठाणे, पानसरे चौक मेन रोड मोंढा रोड ने निघाला होता तरी व्यापा-यांनी स्वयंस्फूर्तीने आपली दुकाने (अस्थापने) बंद ठेवली. घटनेचे अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस प्रशासन देखील सरंक्षणार्थ सज्ज झाले होते. मुख्य रस्त्यावरुन निघालेल्या मोर्चात डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, परभणी झालेल्या घटनेचा धिक्कार मोर्चा “जबतक सुरज चांद रहेगा डॉ बाबासाहेब आंबेडकर तुम्हारा नाम रहेगा”, भारतीय संविधान चिरायू असो अशा घोषणा देण्यात आल्या. मोर्चात भीम अनुयायी व संविधान प्रेमी जनता मोठ्या संख्येने उपस्थित होते. परभणी येथे ज्या समाजकंटकाकडून जे कृत्य केले त्या आरोपीस फाशीची देण्यात यावी व धर्माबाद शहरातील असलेल्या सर्वच महापुरुषांना देखरेख साठी प्रशासनाने तेथे कर्मचारी नेमवुन देण्यात यावे अशा मागणीचे पत्र तहसीलदार मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक माननीय जिल्हाधिकारी यांना धर्माबाद चे तहसीलदार मार्फत निवेदन देण्यात आले निवेदन हे नायब तहसीलदार गावंडे साहेब यांनी स्विकारले. मोर्चा दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब रोकडे यांनी आपल्या सर्व पोलीस फोर्स चा तगडा बंदोबस्त लावला होता.