section and everything up until
* * @package Newsup */?> 5 वी लाठी नॅशनल चॅम्पियनशिप 2024 : उमरगा जि.प.हायस्कूलने पटकावली | Ntv News Marathi

उमरगा : शहरातील जिल्हा परिषद हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी पाचव्या राष्ट्रीय लाठी अजिंक्यपद क्रीडा स्पर्धेत नॅशनल लेव्हलवर प्रथम क्रमांक मिळविला.या निमित्ताने यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा शकुंतला मोरे तर प्रमुख उपस्थितीत अँड आकांक्षा ज्ञानराज चौगुले, सुजाता मोरे, युसुफ मुल्ला आदी मान्यवर होते .
या स्पर्धा गोवा येथे जवाहरलाल नेहरू इंडोर स्टेडियम मडगाव येथे नुकत्याच पार पडल्या. या लाठी नॅशनल चॅम्पियनशिप 2024 उमरगा येथील जिल्हा परिषद हायस्कूलने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत असताना सुवर्णपदक व ट्रॉफी पटकावली या नॅशनल स्पर्धेत प्रशालेतील कुमारी ईश्वरी माने, स्नेहल कांबळे, अफसाना नदाफ, सृष्टी जाधव, श्रेयसी शिंदे या मुलींनी भाग घेतला होता.या स्पर्धेत यजमान गोवा, महाराष्ट्र, तेलंगाना, तामिळनाडू व इतर राज्यांनी सहभाग नोंदवला होता. यात जिल्हा परिषद हायस्कूलच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करून स्पर्धेत उत्कृष्ट यश राष्ट्रीय पातळीवर प्रथमच शाळेला मिळवून दिलेले आहे .या सर्व मुलींनी वैयक्तिक सुवर्णपदक पटकावले आहे.या विद्यार्थिनींना लाठी प्रशिक्षक मोहम्मद रफी शेख यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले तर शालेय स्तरावर गेली तीन महिने ज्ञानज्योती सामाजिक संस्थेच्या सचिव अँड आकांक्षा चौगुले यांच्या सहकार्यातून शंभर मुलींना कराटे व लाठी प्रशिक्षण दिल्याने मुलींनी एवढे मोठे यश राष्ट्रीय स्तरावर मिळवल्याचे प्रशालेचे मुख्याध्यापक पद्माकर मोरे यांनी सांगितले.या यशस्वी विद्यार्थ्यांचा शाळेच्या वतीने भव्य सत्कार करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यशस्वी विद्यार्थिनींचे तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार प्रवीण स्वामी, युवा नेते किरण गायकवाड, अँड आकांक्षा चौगुले, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा शकुंतला मोरे, सुजाता मोरे ,अशोक पतगे, शिक्षण तज्ञ सदानंद शिवदे पाटील, गटशिक्षणाधिकारी शिवकुमार बिराजदार, मुख्याध्यापक पद्माकर मोरे यांनी अभिनंदन केले. कार्यक्रमासाठी पालक विद्यार्थी शिक्षक व शिक्षण प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक पद्माकर मोरे सूत्रसंचालन श्रीमती शिल्पा चंदनशिवे तर आभार सोनाली मुसळे यांनी मानले कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *