section and everything up until
* * @package Newsup */?> करंजीत नेत्र तपासणी शिबीरास रुग्णांचा उस्फूर्त प्रतिसाद | Ntv News Marathi

अहिल्यानगर | अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात करंजी येथील श्री.क्षेत्र उत्तरेश्वर मंदिर सभा मंडपामध्ये श्रीराम देवस्थान श्रीरामगड,उत्तरेश्वर देवस्थान व बुधरानी हॉस्पिटल पुणे तसेच पार्वतीबाई वेताळ सामाजिक संस्था मिरी यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिराचे उद्घाटन महंत शंकर महाराज ससे यांच्या हस्ते व माजी सैनिक शिवाजीराव वेताळ यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.यावेळी शंभरहून अधिक महिला पुरुषांनी या शिबिरामध्ये सहभाग घेऊन नेत्र तपासणी केली.काही रुग्णांना पुणे या ठिकाणी मोफत शस्त्रक्रिया करून घेण्याचा देखील सांगण्यात आले.श्रीराम देवस्थान श्रीरामगड व उत्तरेश्वर देवस्थान सातत्याने विविध सामाजिक उपक्रम राबवत असते.यापूर्वी देखील मोफत सर्व रोग निदान शिबिर,शेतकऱ्यांना शेती विषयक मार्गदर्शन असे अनेक समाज हिताचे उपक्रम या देवस्थानच्या माध्यमातून राबवण्यात येत असल्याने रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा असून गोरगरिबांच्या मदत कार्यातच खरा परमार्थ असल्याचे प्रतिपादन महंत शंकर महाराज ससे यांनी यावेळी केले.बुधरानी हॉस्पिटल पुणे श्रीराम देवस्थान,उत्तरेश्वर देवस्थान यांच्या माध्यमातून यापुढे देखील प्रत्येक महिन्याला मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर आयोजित केले जाणार असून या शिबिराचा गरजू व्यक्तींनी लाभ घ्यावा असे आवाहन संयोजक मंडळीच्या वतीने करण्यात आले आहे.या कार्यक्रमाप्रसंगी डॉ मनिषा कोरडे,माजी सरपंच शिवाजी भाकरे,माजी चेअरमन उत्तम अकोलकर,महादेव अकोलकर,संचालक सुभाष अकोलकर,छत्रपती युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक मोरे,ग्रामपंचायत सदस्य राहुल अकोलकर,डॉक्टर राजेंद्र अकोलकर,युवानेते शेखर मोरे,सुभाष अकोलकर,विकास अकोलकर,नामदेव मुखेकर,ज्येष्ठनेते भाऊसाहेब क्षेत्रे,माजी सरपंच राजेंद्र क्षेत्रे,शिवा मोरे,नितीन खांदवे,संजय अकोलकर,सखाराम मुरडे,मधुकर अकोलकर,दिलीप अकोलकर,सुधाकर अकोलकर,एकनाथ लगड,जगन्नाथ भावले,बंडू अकोलकर,भाऊसाहेब अकोलकर,अंबादास अकोलकर,सोन्याबापु दानवे,सत्यम मुनोत,शुभम मुटकुळे यांच्यासह अनेक पदाधिकारी व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

भिवसेन टेमकर

मो.9373489851

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *