देव दगडात नसून तो माणसात आहे प्राचार्या अस्मिता जोगदंड
राष्ट्रसंत कर्मयोगी थोर समाज सुधारक तथा स्वछतेचे जणक राष्ट्रसंत श्री गाडगे महाराज यांची 68 वी जयंती सनराईज् मेडिकल & एज्युकेशन फौंडेशन सोसायटीच्या साहेबराव पाटील माध्यमिक विद्यालय स्व. एम ई भोरे ज्युनिअर कॉलेज व सनराईज इंग्लिश स्कूल
पाडळी फाटा ता जामखेड, जि अहिल्यानगर येथे मोठ्या उसाहात साजरी करण्यात आली यावेळी अध्यक्षीय मनोगतातून प्राचार्य तथा संस्था सचिव सौ अस्मीता जोगदंड / भोरे बोलताना म्हणाल्या की देव हा दगडात नसुन तो माणसात आहे झाडून परिसर तर शिक्षणाने आपले मन साफ होते तसेच अंधश्रद्धा हि एक माणसाला लागलेली किड असून तुम्ही अडाणी राहु नका आणि चमत्कार असणाऱ्या कुठल्याच गोष्टीवर विश्वास ठेऊ नका कारण तो एक भास असून तो फसवा असतो असे स्पष्ट करत राष्ट्रसंत गाडगे बाबाचे विचार उपस्थिता पुढे मांडत मोलाचे मार्गदर्शन केले या वेळी सर्व विद्यार्थानी महाविद्यालयातील परिसर स्वच्छ करून,शांतपणे उभे राहून संत गाडगे महाराज यांना श्रद्धांजली वाहिली. तर यावेळी प्रा तेजस दादा भोरे यांच्या हस्ते संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेचे पुजन करून पुष्प अर्पण करण्यात आले
या संपूर्ण. कार्यक्रमाचे नियोजन व प्रास्तविक इयत्ता अकरावी विज्ञान शाखेतील कु.श्रुती कांबळे हिने केले,कु.श्रेया जगताप या दोन्ही मुलींनी करत राष्ट्र संत गाडगे महाराज यांचे विचार मांडले.प्रा.दादासाहेब मोहिते,प्रा.विनोद बहिर सर यांनी विद्यार्थ्यांना चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनाच्या आहारी जाऊ नका, देवाधर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका,जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका असे प्रतिपादन करत मार्गदर्शन केले
. तर शेवटी आभार कु.पायल खैरे हिने मानले. यावेळी साहेबराव पाटील माध्यमिक विद्यालय व स्व.एम.ई भोरे जुनिअर कॉलेजचे प्रा.प्रदीप भोंडवे,प्रा. स्वाती पवार प्रा.छबिलाल गावित,प्रा.विवेक सातपुते,सुषमा भोरे चंद्रकांत सातपुते महेश पाटील,दिनकर सरगर,हनुमंत वाघमारे.सनराईज इंग्लिश स्कूल चे प्रिन्सिपल अमर भैसडे,बिभीषण भोरे सुरज वाघमारे ,जयश्री कदम हर्षा पवार , कु सय्यद सानिया वैष्णवी तनपुरे , जयश्री साप्ते, दीपक दहीकर इत्यादी उपस्थित होते
अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी
नंदु परदेशी
मो नं 9765886124