section and everything up until
* * @package Newsup */?> जामखेड प्रतिनिधीदि 12 डिसेंबर | Ntv News Marathi

सौताडा जामखेड रोडचे काम कधी होणार ? या संजय कोठारी च्या प्रश्नाला उप अभियंता लाभाजी गटमळ यांचे उत्तर
ठेकेदार काम करीत नाहीत

आता न्याय मागायचा कोणाला ?

जामखेड ते सौताडा- या रोडचे काम बऱ्याच दिवसा पासुन चालु असुन ते अतिशय धिम्या गतीने होत आहे या कामामुळे जामखेडकरांसह इतर येणारे जाणारे प्रवाशी नागरीक व स्थानीक लोक अडचणीला तोंड देत मुकाट सर्व सहन करत आहेत या संदर्भात जामखेड करांसह सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी वेळोवेळी बांधकाम विभागा कडे लेखी तोंडी अथवा फोनवरून तक्रारी करत लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा काडी मात्र उपयोग झाला नाही कारण वेळोवेळी नुसती खोटी आश्वासने देणे एवढच काम सार्वजनिक बांधकाम खात्याकडुन केल जात असून परिस्थीती दिवसे दिवस गंभीर होत आहे या रस्त्याच्या कामामुळे प्रचंड धुळीचे साम्राज्य खडडे आणि कच सर्वत्र असल्याने गेल्या काही दिवसा पासून येथे रोज छोटे मोठे अपघात रोज घडता आहेत त्यात काही जणांना आपला जीव गमवावा लागला आहे तर काहीना अपंगत्व पत्कारावे लागले आहे धुळी आणि खराब रस्त्या मुळे व्यापारी दुकानदार आणि ग्राहक हैरान झाले असून उलाढाल व दळणवळन प्रक्रिया मंदावली असल्याने शहराचा आर्थिक विकास अधोगती कडे गेले आहे बाजार पेठेवर याचा सर्वात जास्त परिणाम दिसुन येतो सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी हे नेहमी सामाजिक कामा बरोबर अपघात ग्रस्त रुग्नाना घेऊन जाताना खुप यातना चा सामना करतात खडड्या मुळे रुग्णवाहीका नीट चालवता येत नाही रुग्ण वेळेत न पोहचल्यास – त्याचा जीव जाऊ शकतो या वा अनेक कारणाने रस्ता त्वरीत होणे अति गरजेचे असल्याने सामाजिक कार्यकर्ते यांनी उप अभियंता लाभाजी गटमळ यांच्या कडे पुन्हा रोड संदर्भात विचारणा करत रस्ता त्वरीत चांगला करण्याची मागणी केली असता चक्क उपअभियंता लाभाजी गटमळ यांनी सांगीतले की सदर ठेकेदार काम करत नाहीत अस असेल तर अखेर न्याय तरी कुणाला मागायचा असा प्रश्न उपस्थित होत असून
आंधळ दळत आणि कुत्र पिठ खात अशी अवस्था जामखेड करांची झाली असुन यामुळे जर येत्या काळात रस्त्याचा प्रश्न मिटला नाही तर नक्कीच या प्रश्ना साठी लोक रस्त्यावर उतरल्या शिवाय रहाणार नाहीत आणि लावेळी प्रशासनाच्या नाकी दम येईल तेव्हा त्वरीत रस्त्याचा प्रश्न मिटवुन लोकांचा त्रास थांबवावा असे मत सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी व्यक्त करत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे

नंदु परदेशी जिल्हा प्रतिनिधी अहमद नगर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *