♦️जिल्ह्यात अवकाळी पावसाने पुन्हा हजेरी लावली. वादळी वाऱ्यास गुरूवारी ता.५ सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सुरूवात झाली. त्यानंतर सुमारे एक तास मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळल्या. वादळी वाऱ्यासह झालेल्या या पावसाने रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी या पिकांसह आंबा, द्राक्षे, संत्रा- मोसंबी या फळबागांचे ही नुकसान झाले.
♦️जिल्ह्याच्या उत्तरेतील श्रीरामपूर, संगमनेर, अकोले, राहुरीच्या काही भागात पावसाने हजेरी लावली. तसेच नगर तालुक्यासह शहरात पावसाला सुरूवात झाली. या पावसाने सखल भागात पाणी साचले होते. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान झाले.