मौर्य क्रांती महासंघ वाशिम जिल्हा सचिव बंडुभाऊ वैद्द यांचे आवाहन
फुलचंद भगत
वाशिम:-मौर्य क्रांती महासंघाच्या वतीने 29 डिसेंबर वार रविवार रोजी लोकमाता पु.अहिल्यामाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवी वर्षानिमीत्त त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या चांदवड जी नाशिक या ऐतीहासीक नगरीत तिसरे अधिवेशन संपन्न होत आहे.या अधिवेशनाला वाशिम जिल्हयातील समाजबांधवानी मोठया संख्येने उपस्थीत राहण्याचे आवाहन बंडूभाऊ वैद्य यांनी केले आहे.
दोन सत्रात हे अधिवेशन संपन्न होणार आहे.या अगोदर दोन्ही अधिवेशन हे श्री क्षेत्र जेजुरी येथे संपन्न झाले.या तिसऱ्या अधिवेशनाचे उद्घाटन सांगली येथील पेरीयार प्रबोधीनी चे अध्यक्ष इंजी.शिवाजीराव शेंडगे यांच्या हस्ते होणार आहे.या अधिवेशनात पहिल्या सत्रात सत्यशोधक विचाराचे अनुयायी कै. मारोतरावजी पिसाळ यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा सत्यशोधक प्रबोधनकार पुरस्कार प्रसीध्द विचारवंत लेखक व ज्यांनी पिसाळ मामा यांच्या सहवासात कार्य केले असे आर एस.यादव यांना दिल्या जाणार आहे.विशेष सन्मान म्हणून नुकतेच विविध पुरस्काराने सन्मानीत केले गेलेल्या आदर्श ग्राम ढोरखेडयाच्या सरपंच सौ सुनीताताई बबनराव मिटकरी, ठेलारी समाजाच्या हक्काची लढाई लढणारे समाजनेते विठ्ठलभाऊ मारणर खान्देश विभाग ,युवा उदयोजक तथा मातोश्री पतसंस्थेचे संस्थापक हनुमंत दुधाळ शेट पश्चीम महाराष्ट्र यांचा सुध्दा सन्मान केल्या जाणार आहे.या अधिवेशनात वर्षभर घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा यात वक्तृत्व स्पर्धा, राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा, यातील विजेत्यांचा ही बक्षिस सन्मानपत्र देऊन सन्मान केल्या जाणार आहे.उदयोगपती बेंगलोर कर्नाटका चे आनंदा होनमाने यांचे वडील कै.दाजी बाळू होनमाने यांच्या स्मरणार्थ पारीतोषीक दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिल्या जाणार आहेत.
पहिल्या सत्रात महानायक खंडोबा चे लेखक संचीत धन्वे , कराड येथून मौर्य क्रांती महासंघाचे राज्यमहासचिव तुकाराम जानकर , जालना येथील लेखक तथा विभागीय प्रभारी डाॅ.विनोद वाघाळकर , प्रदेश प्रभारी अॅड उत्तमभाई कोळेकर आपले विचार मांडणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणुन बारा बलुतेदार महासंघाचे अध्यक्ष कल्याणराव दळे , मूंबई महानगर पालिकेचे पूर्वाउपायुक्त लक्ष्मण व्हटकर ,धनगर कर्मचारी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अंकुश निर्मळ , पालघर चे इंजी संतोष सातपूते ,वाघर चित्रपटाचे निर्माते राजेंद्र बरकडे , विविध मान्यवर उपस्थीत राहणार आहेत .या सत्राचे प्रास्तविक प्रदेशाध्यक्ष राजीव हाके हे करणार आहेत तर सुत्रसंचलन प्रकाश कुटे व आभार शैलाताई नवघरे मानणार आहेत.या अधिवेशनाची अध्यक्षता मौर्य क्रांती महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बलभिम माथेले करणार आहेत.
दुसरे सत्र हे सर्वासाठी खुले असनार आहे .या सत्रात आजच्या काळात समाजाच्या सर्वागीन विकासासासाठी समाजाने नेमके काय केले पाहीजे यावर पाच सत्रात दिलेल्या विषयावर भुमीका पदाधीकारी मांडतिल व सभागृहातील उपस्थीत सर्वजन या विषयावर खुली चर्चा करतील प्रश्नोत्तरे होतील.चर्चेला अंतीम स्वरूप देवून ते ठराव घेतले जातील व पाठवले जातील.
या सत्राचे आभार विभागीय अध्यक्ष सुभाष शेंगुळे मानतील.
सकाळी 9 वा स्थानीक पदाधीकारी यांच्या उपस्थीतीत होळकर रंगमहाल येथे लोकमाता पु.अहिल्यामाई होळकर यांच्या प्रतीमेच पूजन होवून होळकर वाडा रंगमहाल येथे ज्योत प्रज्वलीत करून सुरूवात होईल .सर्व पदाधीकारी यांच्या उपस्थीतीत होळकरवाडा ते रेणूका लाॅन्स पायी गजीनृत्य व सांस्कृतिक परंपरेनूसार ही ज्योत स्थळापर्यत आणल्या जावून कार्यक्रमाची सुरूवात होणार आहे.
सर्वानी या कार्यक्रमासाठी उपस्थीत रहावे असे आवाहन बंडू भाऊ वैद्य , यांच्या मार्फत करण्यात आले आहे.