फुलचंद भगत वाशिम : विदर्भ लोककलावंत संघटना कारंजाचे पदाधिकारी आणि सहकारी मित्रमंडळी सालाबादप्रमाणे यंदाही विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन दिक्षाभूमीवर जाऊन रविवारी दि. 22 डिसेंबर 2024 रोजी जाऊन नतमस्तक होणार आहेत. “विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हा भारतियांना स्वतंत्र लोकशाहीने जगण्याचे अधिकार दिले.आम्हाला संविधान देवून त्यांनी आमच्यावर अनंत उपकार केले.त्याबद्दल आम्ही त्यांचे आचंद्र दिवाकरौ आमच्या शरिरात प्राण असे पर्यंत त्यांचे ऋणी आहोत.त्यामुळे मी व माझे सहकारी मित्रमंडळी ज्या ज्या वेळी नागपूरला जात असतो.त्या त्या प्रत्येक वेळी सर्वप्रथम दिक्षाभूमिवर जाऊन तेथील स्मारक स्थळावर जाऊन नतमस्तक होऊन अभिवादन करीत असतात.येथे आल्यामुळे आपणास शांती,अहिंसा, मानवसेवेची प्रेरणा व नव ऊर्जा मिळत असल्याचे सुद्धा विदर्भ लोककलावंत संघटना कारंजाचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी सांगीतले.तसेच डॉ.आंबेडकर यांच्या आदर्श विचार सरणीचा आपण पुरस्कार करीत असल्यामुळेच आपल्याला महाराष्ट्र राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाचा राज्यस्तरिय पुरस्कार मिळाल्याचेही ते स्वाभिमानाने सांगत असतात.रविवार दि .22 डिसेंबर 2024 रोजी संजय कडोळे,एकनाथ पवार,शाहीर देवमन मोरे,फुलचंद भगत इत्यादी मंडळी दिक्षाभूमीला भेट देणार आहेत असे विदर्भ लोककलावंत संघटना कारंजा यांनी कळवीले आहे.