निधन वार्ता
स्वातंत्र्य सेनानी श्रीमती केशरबाई किसन कोरे यांचे निधन
जामखेड तालुक्यातील खर्डा येथील ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी केशरबाई किसन कोरे(माळी) यांचे वयाच्या 101 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. माळी कुटुंबातील सर्वात वयोवृद्ध असलेला त्या एकमेव वटवृक्ष असणाऱ्या स्वर्गीय श्रीमती स्वर्गीय केशरबाई आज काळाच्या पडद्याआड गेल्या त्या बोलण्यास अतिशय परखड व स्पष्ट वक्त्या म्हणून परिसरात परिचित होत्या. त्यांना एक मुलगा, तीन मुली, सुना नातवंडे, पतरुंडे असा मोठा परिवार असून त्या श्रीहरी किसन कोरे यांच्या मातोश्री तर श्री. हनुमंत श्रीहरी कोरे(सर) व उमेश श्रीहरी कोरे यांच्या आजी होत्या. त्यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे
नंदु परदेशी
अहमद नगर जिल्हा प्रतिनिधी
मो नं 9765886124