परराज्यातील विदेशी मद्यावाहतुकीवर छापा;वाहनासह मुद्देमाल जप्त
फुलचंद भगत
वाशिम:- डॉ. विजय सुर्यवंशी आयुक्त राज्य उत्पादन शुल्क म. रा. मुंबई, अ. ना. ओहोळ विभागीय उप- आयुक्त रा. डु. शु. अमरावती विभाग अमरावती यांच्या आदेशान्वये व अभिनव बालुरे अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क वाशिम यांचे मार्गदर्शनाखाली नाताळ व नववर्ष इ. सन उत्सवाच्या कालावधीत अवैधरित्या आयात होणारे परराज्यातील विदेशी मद्याविरोधात धडक मोहीम राबविण्याचे आदेश प्राप्त झाल्यानुसार मिळालेल्या खात्रीलायक व गुप्त बातमीप्रमाणे कांरजा येथे महाराष्ट्र राज्यास विक्री प्रतिबंधित असलेला व दादर नगर हवेली, दमन व दिव येथे विक्रीकरीता असलेला विदेशी मद्याचा साठा अवैधरीत्या एका चार चाकी वाहनामधुन वाहतुक करीत असतांना मिळुन आला. सदर वाहनातुन मॅग्डोवेल नं. ०१ व्हीस्की जिचा बॅच क्र. ००१९ / एल – २ दि.०५/१२/२०२४ च्या एकुण १८० मीली क्षमतेच्या १२९६ सिलबंद बॉटल (२७ पेटया) तसेच रॉयल स्टॅग क्लासीक व्हिस्कीच्या ७५० मीली क्षमतेच्या १८० सिलबंद बॉटल (१५ पेटया) जिचा बॅच क्र. २९१५ एल०४ दि. ११ / १२ / २०२४ असा मिळुन आला असुन एक टाटा कंम्पनीचे आर्या चार चाकी वाहन क्र. एम. एच. १२ जे. एम. ४१५५ सह एकुण ८४९२६० /- रु. कीमतीचा मुद्देमाल आरोपीत इसम नामे राहुल कांतीलाल घरटे वय ३८ वर्षे रा. मुरारी नगर नाशिक ता. जि. नाशिक यांच्या ताब्यातुन जप्त करण्यात आलेला असुन सदर आरोपीत इसमा विरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे विविध कलमानुसार गुन्हा नोंद करुन आरोपीस मा. न्यायदंडाधीकारी प्रथम श्रेणी कारंजा यांच्या समक्ष दि. २६ / १२ / २०२४ रोजी हजर केले असता मा.सहाय्यक सहकारी अभीयोक्ता यांच्या युक्तीवादाने सदर आरोपीस दि. ३० / १२ / २०२४ पर्यत एकुण ०५ दिवसांचा पी.सी.आर. मंजूर झाल्याने अवैध मद्याचा स्त्रोत, वाहतुकीचा मार्ग, यामागे अन्य सुत्रधार आहेत किंवा कसे याचा सखोल तपास करण्यात येणार आहे. सदर आरोपीत इसमास पुढील तपासकामी ताब्यात घेण्यात आलेले आहे.
सदरची कारवाई एम. के. उईके निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक वाशिम,आर. पी. मनवर दुय्यम निरीक्षक भ. प. वाशिम,एस. डी. चव्हाण दुय्यम निरीक्षक मंगरुळपीर तसेच जवान सर्वश्री निवृत्ती तिडके स्वप्नील लांडे, बाळु वाघमारे, नितीन चिपडे, विष्णु मस्के, ललीत खाडे, व जवान नि वाहन चालक पी.एम.वाईकर यांनी सहभाग घेतलेला असुन पुढील गुन्हयाचा सखोल तपास मधुकर के. उईके निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक वाशिम हे करीत आहेत.