वरली मटका जुगार खेळणाऱ्या इसमांवर कारवाईत एकूण 4,96,805/-रुपयेचा मुद्देमाल जप्त
फुलचंद भगत
वाशिम:-दि. 26/12/2024 रोजी गुप्त बातमीदाराकडून उपविभागीय पोलीस अधिकारी, वाशिम यांना खात्रीलायक माहिती मिळाली की, मालेगाव येथील आठवडी बाजारातील दिक्षाभुमी जवळील पत्र्याचे शेडच्या मागील मोकळ्या जागेत तसेच जुन्या बसस्टँडजवळ आनंद वाईनबारच्या पाठीमागे मोकळ्या जागेत काही इसम वरली मटक्याचा जुगार खेळत आहेत. अशा प्राप्त माहितीवरुन श्री. नवदीप अग्रवाल भा.पो.से. यांनी त्यांचे पथकासह बस स्टैंड व आठवडी बाजार येथे दोन ठिकाणी छापा टाकला असता सदर ठिकाणी मिलन तसेच कल्याण नावाचे जुगारावर लोक पैश्याचे हारजितने जुगार खेळतांना मिळुन आले. आरोपीकडून 1. नगदी 1,27,905/- वरली मटक्याच्या चिठ्या, हिशोबाचे रजिष्टर, बॉल पेन, 5 मो.सा. 19 मोबाईल असा एकूण 4,96,805 /- रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर अवैध वरली मटक्याचा जुगार चालविणारे व जुगार खेळणारे एकूण 21 आरोपींवर पोस्टे मालेगाव येथे गुन्हा दाखल करुन कारवाई करण्यात आली.
आरोपी- 1. प्रविण मधूकर कानेड 2. विजय गोपाल बोरकर 3. भागवत गोविंदा खवले 4. गजानन रामभाऊ पाचरणे 5. पांडूरंग किसन क्षिरसागर 6. सुधीर डिगांबर लोखंडे 7. गोपाल आनंदा गिते 8. विशाल रमेश शर्मा 9. विजय विठ्ठल वानखेडे 10. गणेश बंडूजी नवलकर 11. सुरेश युवराज सावळे 12. विलास जालिंदर बोरकर 13. शिवा पांडूरंग बोरकर 14. सुरेश पांडूरंग हांडे 15. विजय भागिरथ शर्मा 16. किसन लक्ष्मण ढोरे 17. कुंडलिक सखाराम काळे 18. गणेश शंकरराव भालेराव 19. किसन भिवाजी भगत 20. रमेश प्रकाश वाघमारे 21. पुरुषोत्तम मोतीलाल वर्मा.
सदर कारवाई मा. पोलीस अधिक्षक श्री. अनुज तारे, मा. अपर पोलीस अधिक्षक श्रीमती लता फड यांचे मार्गदर्शनात सहायक पोलीस अधिक्षक श्री. नवदीप अग्रवाल, सपोनि दिनेश शिरेकार, पोहेकाँ हरिभाऊ कालापाड, पोकाँ स्वप्नील शेळके, पोकाँ शंकर वाघमारे चापोकाँ कोकाटे यांनी केली.