मंगरूळपीर येथील घटना
फुलचंद भगत
वाशिम:-मंगरूळपीर येथील बस स्थानकातून पाच लाख 93 हजार रुपयाचे दागिने असलेली महिलेची पर्स अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना बुधवार दिनांक 25 डिसेंबर रोजी सायंकाळी घडली.या प्रकरणी दाखल तक्रारीवरून मंगरूळपीर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे.
अकोला शहरातील खडकी येथील रहिवासी जयश्री रवींद्र ठाकरे वय 54 या महिलेने तक्रारीत नमूद केले आहे की बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजता सुमारास फिर्यादी बसने अकोला येथे जाण्यासाठी मंगरूळपीर बस स्थानकात बसमध्ये चढत असताना त्यांच्याकडील पांढऱ्या रंगाची पर्स कोणीतरी अज्ञात व्यक्तीने चोरून नेली व त्याच्यामध्ये पाच लाख 93 हजार रुपयाचे किमतीचे दागिने होते.मंगरूळपीर पोलीस पुढील तपास करत आहे.