फुलचंद भगत
वाशिम:-जन आक्रोश निषेध मोर्चा तहसील कार्यालयांवर धडकला त्यामध्ये प्रामुख्याने परभणी घटनेचा निषेध करण्यात आला आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरावर संसदेत अपमान जनक वक्तव्य केल्यामुळे त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे आणि त्यांच्या वर ॲट्रॉ सिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी आंबेडकरी चळवळीचा हा जनाक्रोश निषेध मोर्चा काढण्यात आला आहे.

मालेगाव येथील स्थानिक तहसील वर हा मोर्चा धडकला जन आक्रोश निषेध मोर्चाला पंचायत समिती जवळून सुरूवात झाली आणि मेन लाईन मार्गे, जोगदंड हॉस्पिटल, जून्या बस स्थानकावरून, सिव्हिल लाईन मधून तहसील वर पोहचला.परभणी येथील घडलेल्या घटनेची स्वतंत्र आयोगामार्फत चौकशी करून तेथील दोषी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाल्याच पाहिजे त्याच बरोबर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरावर संसदेत अपमान जनक वक्तव्य केल्यामुळे त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे आणि त्यांच्या वर ॲट्रॉ सिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी हा जनाक्रोश निषेध निघाला होता.सर्व आंबेडकरी विचारधारेच्या व संविधानावर प्रेम करणाऱ्या व्यक्ती तसेच तमाम पक्ष संघटना संस्था व विविध गटातटाच्या कार्यकर्त्यांते यामध्ये सहभागी झाले होते.परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड करण्यात आली येथील आंबेडकरी जनतेने त्या घटनेचा निषेध करण्याकरिता आंदोलन करण्यात आले. त्यामध्ये पोलिसांनी कार्यकर्त्यांना तसेच महिलांना प्रचंड अमानुष मारहाण केली व त्यांच्यावर खोट्या केसेस दाखल केल्या इतकेच नव्हे तर या घटनेमध्ये भीम योद्धा विधी शास्त्राचा विद्यार्थी शाहिद सोमनाथ सूर्यवंशी यांना बेदाम अमानुष्य पोलिसांच्या मारहाणी मुळे न्यायालयीन कष्टडीमध्ये आपला जीव गमावावा लागला ही फार मोठी दुःखदायक घटना आहे. असे नेत्यांचा भाषणातून विचार व्यक्त करण्यात आले.तर दुसरीकडे आपल्या देशाच्या संसदमध्ये गृहमंत्री अमित शहा असे म्हटले की आंबेडकर आंबेडकर आंबेडकर म्हणण्याची फॅशन झाली आहे एवढ्या वेळात देवाचे नाव घेतले तर सात जन्मापर्यंत स्वर्ग मिळेल तुमच्या या बेतल वक्त्यावर अभद्र विधानाबद्दल तुमचा जाहीर निषेध करून त्यांच्या वर ॲट्रॉ सिटी कायद्या अंतर्गत कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.या मोर्चाद्वारे खालील मागण्यांचे निवेदन महाराष्ट्राचे राज्यपाल तसेच भारताचे राष्ट्रपती यांना पाठविण्या साठी तहसीलदार यांना देण्यात आले.
१) परभणी प्रकरणात ज्या कार्यकर्त्यांवर खोट्या केसेस दाखल केल्या आहेत. त्या केसेस वापस घेण्यात याव्यात.
२) जो भिमयोध्दा सोमनाथ सुर्यवंशी शहीद झाला त्याच्या कुटूंबाला शासनाने ५ कोटी रुपयाची सानुग्रह मदत देण्यात यावी. तसेच त्या कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नौकरी देण्यात यावी व या हत्येला जबाबदार असलेल्या दोषी पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कडक कारवाई करुन त्यांना बडतर्फ करण्यात यावे.
३) परभणी येथील संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड प्रकरणी व सोमनाथ सुर्यवंशीच्या हत्या प्रकरणाची चौकशी एका स्वतंत्र आयोगाकडुन करावी.

४) देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचा राजीनामा महामहीम राष्ट्रपती महोदयांनी घ्यावा.
५) देशामध्ये एस सी/एसटी समुदायावर सतत होत असलेले अन्याय, अत्याचार व खोट्या केसेस दाखल होतात ते त्वरीत थांबविण्यात यावे.
या मोर्चाचे प्रमुख आयोजक आंबेडकरी चळवळीचे नेते बबन बनसोड,भाई गोवर्धन चौथमल, जे एस शिंदे, देवा इंगळे ,अजबराव सदार, विनोद अंभोरे, रुपेश भगत, बाळासाहेब सावंत, गौतम कंकाळ ,भारत गुडदे, कैलास तायडे, प्रकाश आठवले, अमोल पखाले, सुनील तायडे,एडवोकेट विजय बनसोड ,एडवोकेट राहुल गवई, चेतन इंगळे, शाहीर संजय इंगळे, नरेंद्र खडसे ,भास्कर गुडदे, गौतम कंकाळ व समाजातील सर्व स्तरातील लोक सहभागी झाले होते. मालेगाव पोलिसांच्या वतीने या वेळी तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.