देवी वैभवीश्रीजी च्या अमृतवाणीतून होणार कथा

फुलचंद भगत
वाशिम : स्थानिक हिंगोली नाका येथील उत्सव लॉन सिताराम धाम येथे बाहेती परिवाराच्यावतीने प्रसिध्द कथावाचक देवी वैभवीश्रीजी यांच्या अमृतवाणीतून 29 डिसेंबरपासून 1 जानेवारीपर्यंत भक्तराज हनुमान कथेचे आयोजन करण्यात आले आहे. दु. 3.30 ते 5.30 वाजेपर्यंत कथेचे आयोजन करण्यात आलेले आहे. 29 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजतापासून हनुमान चालीसा पठण व हवन श्री रोकडीया हनुमान मंदिर शेलु मानवत व 108 हनुमान चालीसा मंडळ हे सादर करणार आहेत. 01 जानेवारी सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत काल्याचे किर्तन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. यापूर्वीही बाहेती परिवाराच्यावतीने देवी वैभवीश्रीजी यांच्या अमृतवाणीतून श्रीमद् भागवत कथा व शुक्रवार पेठ येथे हनुमान कथा पार पडली आहे. सदर कथेचा लाभ भक्तांनी मोठ्या संख्येने घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *