फुलचंद भगत
वाशिम:- मंगरूळपीर तालुक्यामधील मंगळसा गट ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या वाढा फार्म येथील नवीन बुद्ध विहार सभागृह व गावांमधील सिमेंट काँक्रेट अंतर्गत रस्ते उद्घाटन दिनांक 26 -12 -2024 रोजी संपन्न झाले आहे.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मंगरूळपीर तालुक्यामधील अजित पवार गटाचे सरपंच संघटना विभागीय अध्यक्ष चंद्रकांत पाकधने व तसेच माजी उपसरपंच विनोद खंडरे, मुरलीधर पाक धने, गुलाबराव वानखडे , ग्रामपंचायत अधिकारी (ग्रामसेवक) मुकेश सुरडकर व तसेच ग्रामपंचायत कर्मचारी अरुण राऊत उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरज भगत व आभार प्रदर्शन विनोद मनवर पोलीस पाटील वाढा यांनी केले या कार्यक्रमाला गावांमधील नवयुवक दीक्षांत सोनोने, अमोल निचड, रामदास सोनोने, भारत भगत, जयपाल इंगळे ,गंगाराम रोकडे ,अक्षय इंगळे ,मधुकर निचळ,रमेश मनवर आकाश इंगोले, बुद्धपाल भगत,लक्ष्मण उचित , वैशाख इंगोले, योगेश वरघट व तसेच महिला ही उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *