फुलचंद भगत
वाशिम:-नुकत्याच पार पडलेल्या शालेय क्रीडा स्पर्धेत मंगरुळपिर येथील मातोश्री पार्वतीबाई नाईक कन्या शाळेतील १९ वर्षे वयोगटातील “आट्या-पाट्या” संघांनी दैदिप्यमान कामगिरी करीत राज्यस्तरीय स्पर्धेकरीता पात्र ठरला आहे.
जिल्हा क्रीडा संकुल,वाशिम जि.वाशिम येथे पार पडलेल्या १९ वर्षे वयोगटातील मुलींचा “आट्या-पाट्या” स्पर्धेत मातोश्री पार्वतीबाई नाईक कन्या शाळेचा १९ वर्षीय मुलींचा संघ विभागातून प्रथम येऊन राज्यस्तरावर पोहोचला आहे. सदर खेळाडूंनी आपल्या यशाचे श्रेय क्रीडा उपसंचालक संतान साहेब,जिल्हा क्रीडा अधिकारी लता गुप्ता मॅडम, आट्या-पाट्या क्रीडा मार्गदर्शक किशोर बोण्डे,मातोश्री पार्वतीबाई नाईक बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष तथा मा. प्राचार्य संतोष राठोड, प्राचार्य बाळासाहेब गोटे, कुलदीप बदर, विजय खोखले, हितवा बेनिवाले, सुनिल देशमुख,शिवछत्रपती क्रिडा पुरस्कार प्राप्त सागर गुल्हाने, ऋषीकेश देशमुख,कैलास जाधव, रविभाऊ जाधव,मातोश्री पार्वतीबाई नाईक कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या कु सुनिता पवार मॅडम, क्रीडा शिक्षक एम.डब्लू.भगत यांना दिले.
शाळेतील १९ वर्षे वयोगटातील मुली राज्यस्तरीय आट्या-पाट्या स्पर्धेत अमरावती विभागाचे नेतृत्व करतील. संघाच्या दैदिप्यमान कामगिरीबद्दल मातोश्री पार्वतीबाई नाईक बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष तथा मा. प्राचार्य संतोष राठोड, शाळेच्या प्राचार्या कु सुनिता पवार मॅडम यांनी विजयी संघाचे अभिनंदन करीत राज्यस्तरीय खेळासाठी शुभेच्छा दिल्या. संपूर्ण परिसरातून सर्व विजयी खेळाडूंचे कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *