अवैध गुटखा विक्री करणाऱ्या इसमावर धडक कारवाईत एकूण 14,76,620 /- रुपयेचा मुद्देमाल जप्त

ऊपविभागिय पोलिस अधिकारी वाशिम पथकाची कारवाई

फुलचंद भगत
वाशिम:-दि. 26/12/2024 रोजी गुप्त बातमीदाराकडून उपविभागीय पोलीस अधिकारी, वाशिम यांना खात्रीलायक माहिती मिळाली की, शिरपूर येथे ओमकार कॉलनी ओमकार मेडीकल जवळ एक इन्स्ट्रा क्र.एमएच 37 टी 2488 वाहन उभी असून सदर गाडीमध्ये शासन प्रतिबंधीत गुटखा असल्याबाबत खात्रीलायक गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली. अशा प्राप्त माहितीवरुन श्री. नवदीप अग्रवाल भा.पो.से. यांनी त्यांचे पथकासह सदर ठिकाणी जाऊन छापा टाकला असता ओमकार कॉलनी ओमकार मेडीकल जवळ एक टाटा इन्स्ट्रा क्र. एमएच 37 टी 2488 वाहन उभी असल्याचे दिसून आले. सदर वाहनाची पंचासमक्ष पाहणी केली असता आत मध्ये 17 नग प्लास्टीक गोण्यामध्ये शासन प्रतिबंधीत गुटखा असल्याचे दिसून आले. सदर मालाची मोजदाद केली असता त्यामध्ये 1. कथीया रंगाच्या 13 गोण्या ज्यामध्ये वाह पान मसाला व सुगंधी तबांखु 2. पांढऱ्या रंगाच्या 4 गोण्या ज्यामध्ये पानबहार पान मसाला असा एकूण 6,76,620 /- रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच टाटा इन्स्ट्रा वाहन क्र. एमएच 37 टी 2488 किंमत 8,00,000/- रुपयेची असा एकूण 14,76,620/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला व अनिल दशरथ वाघ यांचे विरुध्द पोस्टे शिरपूर येथे गुन्हा दाखल करण्यात
आहे.
सदर कारवाई मा. पोलीस अधिक्षक श्री. अनुज तारे, मा. अपर पोलीस अधिक्षक श्रीमती लता फड यांचे मार्गदर्शनात सहायक पोलीस अधिक्षक श्री. नवदीप अग्रवाल, सपोनि दिनेश शिरेकार, पोहेकाँ हरिभाऊ कालापाड, पोकाँ स्वप्नील शेळके, पोकाँ शंकर वाघमारे चापोकाँ कोकाटे यांनी केली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *