सचिन बिद्री:उमरगा
उमरगा तालुक्यातील तुरोरी येथील प्रमोद व प्रणिता कराळे यांचे मागील काही दिवसांपुर्वी अपघाती निधन झाले होते. त्यांच्या पश्चात तीन मुली व आई असा परिवार असुन तिन्ही मुलींच्या शिक्षणासाठी शिवसेना उपनेते तथा माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या वतीने प्रत्येकी ५० हजार रू. या प्रमाणे एकुण दीड लाख रू. मदत करण्यात आली आहे.
तुरोरी येथील प्रमोद कराळे व त्यांच्या पत्नी प्रणिता कराळे हयांचे १८ डिसेंबर रोजी रात्री साडेसातच्या दरम्यान लक्ष्मी पाटीजवळील अपघातात दुख:द निधन झाले होते. यानंतर मा.आमदार तथा शिवसेना उपनेते ज्ञानराज चौगुले यांनी मयत कुटुंबाची भेट घेऊन तीनही मुलींचे पुढील शिक्षण पुर्ण करण्याची जबाबदारी स्विकारली होती व प्रत्येकी पन्नास हजार रूपयांचे आर्थिक सहाय्य करण्याचे आश्वासित केले होते. दिलेला शब्द पाळत शुक्रवार दि.३ रोजी सायंकाळी युवासेना विभागीय निरीक्षक कु.आकांक्षाताई ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते प्रतिक्षा कराळे, प्रांजल कराळे, व प्रज्ञा कराळे या तिन्ही मुलींच्या नावे प्रत्येकी ५० हजार रूपयांची मुदत ठेव ठेवलेले प्रमाणपत्र मुलींची आज्जी विमल कराळे, मामा गणेश सुर्यवंशी यांच्या उपस्थितीत सुपुर्द केले.
यावेळी शिवसेना शाखाप्रमुख विजयकुमार भोसले, उपसरपंच तुकाराम जाधव, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष पवन जाधव, भाजपचे बालाजी माणिकवार, शाहुराज भोसले यांच्यासह सौदागर सुर्यवंशी, नंदकिशोर पाटील, आनंद शिंदे, नवनाथ जाधव आदींची उपस्थिती होती.