त्यांच्या विचारा मुळेच आज महिला शिक्षण क्षेत्रात पुढे आहेत
ग्रामीण विकास केंद्र खर्डा येथे फातिमा शेख यांची जयंती साजरी
दिनांक 9/1/2025 रोजी ग्रामीण विकास केंद्र संचलित भटके विमुक्त संसाधन केंद्र खर्डा येथे सावित्री फातीमा शेख यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली या जयंती कार्यक्रमा दरम्यान बोलताना विशाल पवार म्हणाले की, सावित्री फातिमा यांच्या विचार सरणीमुळे महिलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचे काम त्यांनी केले. तसेच मंगल शिंगाणे म्हणाल्या की , सावित्री फातिमा यांचे विचार समजून घेणे गरजेचे आहे. तसेच नीता इंगळे म्हणाल्या की फातिमा व सावित्रीबाई फुले यांनी जर शिक्षणाचा विचार नसता केला तर महिला आज शिकल्या नसत्या. तसेच उर्मिला कवडे म्हणल्या की, विधवा परित्याकता या महिलांनी सावित्री फातिमा यांच्यातील विचार थोडा का होईना पण घेतला पाहिजे. या कार्यक्रमासाठी भीमराव सुरवसे, गणपत कराळे , रेखा खटावकर, रुकसाना मापाडी,आशा टेपाळे, सविता अंकुश, गोदावरी नाईक, राणी बोत्रे, आदी उपस्थित होते
नंदु परदेशी
जिल्हा प्रतिनिधी अहिल्यानगर
मो नं 9765886124