इमर्जन्सी ब्लड ग्रुप डोनरच्या वतीने सत्कार समारंभ व भव्य रक्तदान

वाशिम:-विविध सेवाभावी ऊपक्रम राबवुन गोरगरिबांची सेवा अविरत करीत असलेले सेवाभावी व्यक्तिमत्व तथा पञकार फुलचंद नारायण भगत यांचा दि.१२ जानेवारी रोजी इमरजंशी ब्लड डोनर गृपकडुन घेण्यात अलेल्या कार्यक्रमामध्ये प्रशस्तीपञक देवुन सत्कार करण्यात आला आहे.
मंगरूळपीर शहरातील मंगलमधम येथील इमर्जन्सी ब्लड ग्रुपच्या वतीने वाशिम जिल्ह्यामधील इमर्जन्सी ब्लड ग्रुप डोनर च्या वतीने दि.१२ रोजी राजमाता जिजाऊ आणी स्वामी विवेकानंद जयंतिच्या औचित्याने कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गणेश खोडे,संजय मिसाळ,सुनील मालपाणी,सागर गुल्हाने,सचिन कुळकर्णी,श्रिहरी इंगोले,अर्जुन सुर्वे,राजु जयस्वाल,गोपाल भुसारे,इमरजंशी ब्लड डोनर गृपचे इंगोले आदी उपस्थित होते.यावेळी इमर्जन्सी ब्लड डोनर ग्रुपच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले व वाशिम मंगरूळपीर मानोरा कारंजा वनोजा येथील समाज योगी कार्यात अग्रेसर राहणारे असणारे व सदैव तत्पर असणारे समाज कार्य करणारे तसेच आपत्ती व्यवस्थापन पथक पिंजर तसेच मंगरूळपीर येथील मानव सेवा कार्य करणारे, वाशिम जिल्ह्यामधील समाजसेवक तसेच पत्रकार महाराष्ट्र आयकॉन पुरस्कार विजेते फुलचंद भगत यांचा सत्कार करण्यात आला.अध्यक्ष भाषणामध्ये गणेश खोडे यांनी मंगरुळपिर शहरांमधील छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक उभारून येथील मंगरूळ पिर तालुक्यातील मोफत अभ्यासिका व त्याच्यावरती भव्य असा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात येईल अशी ग्वाही दिली जेणेकरून तालुक्यामधील होतकरू विद्यार्थी या मोफत अभ्यासिकेचा लाभ घेतील.
इमर्जन्सी ब्लड डोनर ग्रुपच्या वतीने संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अथक परिश्रम घेतले व कार्यक्रम यशस्वीतेने पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *