फुलचंद भगत
वाशिम:-जिजामाता जयंती व स्वामी विवेकानंद जयंती युवा दीन निमित्त रक्तदान शिबिर, नेत्र तपासणी, आरोग्य तपासणी शिबिर जीवरक्षक दाता ग्रूप व बहुउद्देशीय संस्था संचलित इमर्जन्सी ब्लड डोनर ग्रूप मंगरुळपीर यांच्या वतीने आयोजित कार्यक्रम करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.गणेशभाऊ खोडे, उद्घाटक संजयजी मिसाळ साहेब , प्रमुख पाहुणे सौ सोनाली ताई देशमुख, सागर भाऊ गुल्हाने, श्रीहरी इंगोले, अर्जुन भाऊ सुर्वे , प्रभाकर दळवी, सूरज खोडे, सुनील भाऊ मालपाणी, सचिन कुलकर्णी, दिलीप भाऊ चौधरी, राजू भाऊ जयस्वाल, सचिन राव पवार, गोपाळ भुसारे, यांच्या हस्ते वाशिम जिल्ह्यातील सामाजिक कार्य करणाऱ्या 30 संस्थांचा शिल्ड व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. यावेळी 55 व्यक्तींनी रक्तदान केले.
जवळपास 70ते 80 रुग्णाची नेत्र तपासणी व आरोग्य तपासणी करण्यात आली.
यावेळी डॉ. संतोष संगेवर, डॉ. अजय वाघमारे, डॉ. श्रीकांत सोनोने यांनी सेवा दिली.यावेळी श्रीकांत इंगोले अध्यक्ष, अमोल अंबलकर उपाध्यक्ष, ओंकार जोशी सचिव , सत्यम पाटील , सावन कांबळे ,गोलू फरास, गोपाळ ठाकरे, प्रवीण मुंढरे , अक्षय शिरसगर ,भूषण भोकरे, सुमित मुंढरे , सारंग पाटील, पावन जयस्वाल, धर्मराज गावंडे, हरीश सुर्वे, बळीराम चव्हाण , संतोष ठक, आकाश चौधरी, सूचित देशमुख, गिरिधर तापडिया, राहुल साळुंके, सतीश चौहान, सचिन अंबालकर, प्रतीक इंगोले, ऋतिकेत जाधव, विशाल घडीमकर, संतनु ठाकूर, आकाश जाधव, आजू भाई, निलेश भडांगे, सनी खंडारे, तुषार जवके, ज्ञानेश्वर देशमुख, सचिन अंबलकर, व प्रभाकर दळवी आणि सर्व इमर्जनशी ब्लड डोनर ग्रूप मंगरूळपीर यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमाचे संचालन सुचित देशमुख यांनी केले व आकाश चौधरी यांनी आभार प्रदर्शन केले.
