कल्याण डोंबिवलीत विना हेल्मेट प्रवास करणाऱ्या बाईकस्वारांना आता हजार रुपये दंड भरावा लागणार आहे. कल्याण डोंबिवलीत वाहतूक विभागाकडून हेल्मेट न घालणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई सुरु आहे. हेल्मेट न घालणाऱ्या बाईकस्वारांवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून करडी नजर ठेवली जात आहे. प्रत्येक सिग्नलवर सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात आले आहेत. ज्या चौकात असा प्रकार दिसून येतो त्या बाईकस्वारांच्या विरोधात कारवाई केली जाते.