MUMBAI | बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) ला एका अज्ञात व्यक्तीने बॉम्बने उडवण्याची धमकी दिली आहे. ही धमकी ईमेलद्वारे BSE च्या अधिकृत वेबसाइटवर पाठवण्यात आली होती. धमकीचा ईमेल मिळताच संबंधित अधिकाऱ्यांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क साधला. यानंतर बॉम्ब शोध पथक आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. संपूर्ण परिसराची तपासणी करण्यात आली; मात्र प्राथमिक तपासात काहीही संशयास्पद आढळून आलेले नाही, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. पोलिसांनी सतर्कता बाळगत तपास सुरू ठेवला आहे.