WASHIM | सहकार विभागाकडे प्राप्त झालेल्या मंगरुळपीर तालुक्यातील अवैध सावकारी व्यवहारासंबंधीच्या तक्रारीची चौकशी करणे करीता महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ चे कलम १६ अंतर्गत गैरअर्जदार रा. मंगरुळपीर जि. वाशिम यांचे राहते घरी व व्यवसायाचे ठिकाणी सहकार विभाग व पोलिस विभागाकडील पथकाव्दारे दिनांक २७/०१/२०२५ रोजी झडतीची कार्यवाही करण्यात आली.
गैरअर्जदाराचे ठिकाणी करण्यात आलेल्या झडतीच्या कार्यवाही दरम्यान पुढिल चौकशीकरीता काही दस्तऐवज ताब्यात घेण्यात आलेले आहेत. सदर प्रकरणी सावकारी कायद्या अंतर्गत पुढील चौकशी करण्यात येत आहे.सदरची कार्यवाही ही मा. भुवनेश्वरी एस., जिल्हाधिकारी, वाशिम, मा. अनुज तारे, पोलिस अधिक्षक, वाशिम यांचे मार्गदर्शनाखाली श्री ओमप्रकाश साळुंके, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, वाशिम यांचे नियंत्रणाखाली पार पाडण्यात आलेली आहे.सदर कार्यवाही मध्ये श्री. पी. टी. सरकटे, सहायक निबंधक, सहकारी संस्था, मंगरुळपीर, श्री. एस. जी. गादेकर, वरिष्ठ लिपिक, वाशिम, श्री पी. एन. झळके, सहकार अधिकारी श्रेणी-१, वाशिम, श्री एस. पी. रोडगे, मुख्य लिपीक, रिसोड, श्री. एम. जे. भेंडेकर, प्रतवार पर्यवेक्षक, वाशिम कु. ए. के. जाधव, मुख्य लिपिक मंगरुळपीर, श्री. आर. राऊत, सहायक सहकार अधिकारी, मंगरुळपीर, तसेच पोलिस विभाग व महसुल विभागातील कर्मचारी यांनी कामकाज केले आहे.
तरी वाशिम जिल्ह्यातील सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी अवैध सावकारी व्यवहार करणाऱ्यावर प्रभावी नियंत्रण व कार्यवाही करण्याकरीता सहकार विभागाचे जिल्हा निबंधक (सावकारी) तथा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, वाशिम व प्रत्येक तालुक्यातील सावकारांचे सहायक निबंधक तथा सहायक निबंधक, सहकारी संस्था कार्यालयाकडे गोपनिय स्वरुपात तक्रारी दाखल करुन अश्या व्यक्तींची माहिती द्यावी. तक्रारदाराचे नाव गोपनिय ठेवण्यात येईल.असे आर. आर. सावंत)
सहायक निबंधक (प्रशा) अंतर्गत 12
जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था वाशिम यांनी कळवले आहे.
प्रतिनीधी | फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो. 8459273206