Ntv चा सोशलसर्वे:परिणाम धक्कादायक.?
रील्स Time Pass मुळे बदलतेय मानसिकता.? आळशी पॅटर्न
(सचिन बिद्री:धाराशिव)
गेल्या काही वर्षात सोशल मिडीयचा वापर झापाट्याने वाढतोय, अगदी एका वर्षाच्या बाळापासून 80 वर्ष्याच्या वयोवृद्धापर्यंत, रस्त्यावर भिक्षा मागून मागून खाणाऱ्यापासून उद्योजकापर्यंत प्रत्येक व्यक्ती सोशल मीडियाशी जुडलेला दिसून येतोय. पण याचा प्रामुख्याने वापर दोन प्रकारच्या कारणासाठी करतानाचा अहवाल समोर येत आहे.पहिला म्हणजे स्वतःच्या कामासाठी मग त्यात व्यापार उद्योग जाहिराती,अभ्यास करण्यासाठी आणि दुसरा म्हणजे केवळ अन् केवळ वेळ घालवण्यासाठी टाईम पास. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे टाईम पास करणाऱ्यांची संख्या स्वतःच्या कामासाठी वापर करणाऱ्यांच्या तुलनेत अधिक असून हा रेशो 70-30 चा आहे.इन्स्टाग्राम, फेसबुक किंवा यूट्यूबवर रील्स पाहत नाहीत,अशी माणसं आता शोधून सापडायची नाहीत! ही काही अतिशोयक्ती नाही,वास्तव आहे. आपल्यापैकी अनेकजण तासन् तास स्क्रीनला चिकटून असतात.रील्स पाहण्यात किती वेळ निघून गेलाय, हे आपल्याला लक्षातच येत नाही.मीम्स, रिल्स बघण्यात आपण इतके गुंग होतो की अनेक गोष्टींचा त्यापुढे विसर पडतो.त्यामुळे आर्टिकल अतिशय महत्वाचा आहे. मोठा आहे तितकाच महत्वाचा आहे. वेळ काढून आवश्य वाचा आणि इतरांना शेअर करा.
कामात रस नाही.?
उमरगा शहरातील काही बांधकाम उद्योजक(बिल्डर्सशी)चर्चा केल्यावर माहिती समोर आली की, स्थानिक कामगार कामात दिरंगाई, कामचुकारपणा आणि आळस करतात, कामावर आलेच तर आठवड्याचा पगार घेतल्यावर पुढल्या आठवड्यात दांडी मारतात पण बिहारि, युपी अन् छत्तीसगडहुन आलेले कामगारांना दिलेल्या वेळेच्या आत काम पूर्ण करून दुसऱ्या कामाचा शोधात असतात. स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध असताना स्थानिक पातळीवर कामगार उपलब्ध का होत नाहीत.?कां परराज्यातील कामगार जन्मभूमी सोडून उमरग्यात रोजगार प्राप्त करत आहेत.? या प्रश्नाचं उत्तर जितकं सोपं तितकं भयानक आहे.कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये असलेले हमालापासून , बांधकाम कामगार /मिस्त्री/ फडशी कामगार तर आता काही व्यापारातही परप्रांतीय आवर्जून बिहारी, युपी चे लोक दिसून येत आहेत.या बाबीना कुठे कुठे पुन्हा सोशल मीडिया-रील्स-कष्ट न करण्याची मानसिकता आणि टाईम पास करण्याची सवय जबाबदार असे म्हणता येईल.
जवळ असूनही दुरावा.?
एका घरात 5 व्यक्ती, आई वडील दोन भावंडे तर एक मुलगी. प्रत्येकाकडे स्मार्ट फोन. घरी असताना हॉल मध्ये सगळे आपापले मोबाईल हातात धरून टाईम पास करत बसलेले, त्याना दुरून पाहिल्यावर असं वाटलं की पूर्ण परिवार एकत्र बसून काही पारिवारिक चर्चा करत असेल पण जवळ जाऊन बसल्यावर वेगळंच चित्र समोर आलं. प्रत्येक जण रील्स पाहत होते. कोण फेसबुक वर स्क्रोल करत होता तर कोणी युट्युब तर कोणी दूर असलेल्या एका मित्रांसोबत चॅटिंग पण कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र असूनही त्यांच्यात किती मोठा दुरावा निर्माण झालाय हे यावेळी अनुभवास आलं. मुला मुलींच्या मोबाईल मध्ये किती आणि कोणकोणते ऍप्स आहेत हे आई वडिलांना ठाऊक नाही.. एवढंचं काय, मुलीनं मोबाईल ठेवून काही वेळेसाठी पाणी प्यायला किचन मध्ये गेल्यावर तिच्या आईने वाय फाय जोडण्यासाठी मोबाईल घेतला तेंव्हा त्या मोबाईल चा पासवर्ड आईलाच माहित न्हवते. एवढ्यात मुलीनं स्वतः येऊन हॉटस्पॉट सुरु केला पण आपल्या मोबाईलचा पासवर्ड काही आईला सांगितलं नाही. माझा एक मित्र तिच्या बायकोला नौकरी लागल्याने दोन वर्षाच्या मुलासह उमरगा सोडून मुंबई स्थायिक झाला आहे. मित्र महिन्यातून एक वेळ शेतीकडे पाहणी करण्यासाठी येतो केवळ 4 दिसासाठी तेंव्हा चार दिवस तिची पत्नी जॉब वर गेल्यावर दोन वर्षाचा मुलगा मुंबई मधल्या फ्लॅट मध्ये निवांत राहतो याचं रहस्य खूप भयानक आहे.त्या दोन वर्षाच्या मुलाला मोबाईल हवा. मोबाईल असेल जवळ तर तो एकदा दिवस भर घरात आनंदात राहतो असं माझ्या मित्रानं मला सांगितलं. मोबाईल मध्ये रील्स पाहत बसतो, भूक लागल्यावर किचन मध्ये जाऊन जेवतो आणि रील्स पाहत बेड वर झोपी जातो अशी काही दिनचर्या या दोन वर्षाच्या बाळाची असल्याबाबत समजली. पण भविष्य अंधारमय होणार अशी टीका करत मी त्याचे समुपदेशन करण्याचा आयशस्वी प्रयत्न केला.
तुमची प्रॉपर्टी अन् पैसा तुमच्या पाल्याना तारणार का.?
बऱ्याच पालकांशी संवाद करताना त्यांच्या पाल्याबद्दल एक विचारसरणी समोर आली. शेती आहे, एवढं मोठं घर आहे मला तर पेन्शन भेटेल मुलगा शिकला तर शिकेल नाहीतर बसून खाईल, शेवटी शेती जरी सांभाळली तरी पुरेसं..!आमचं तर आयुष्य कष्ट करण्यात सरतय मुलं तरी जगू दया आयुष्य.अशी भावना उमरग्यातील बऱ्याच पालकांची बनलेली दिसून आली. दोन लाखाची बुलेट आणि लाखाच्या किंमतीचा मोबाईल बाळगून मुलगा नेमकं कुठे कुठे जातोय, कोणाच्या संगतीत वावरतोय, संगतीचा काय परिणाम उद्भवू शकतो याबाबत पालकांतून उदासीनता दिसून आली. ज्या वयात आई वडिलांची आदरयुक्त भीती पाल्याना हवीय त्या वयात पालकांकडून अतिलाड पुरवले जात आहेत का.? असा संशय निर्माण होतोय. या अश्या परिस्थितीचा केवळ संबंधित परिवारावरच परिणाम न होता समाजावर, गावावर आणि अप्रत्यक्षरित्या देशाच्या विकासावरही पडतो हे सर्वप्रथम सर्वाना अवगत होणे गरजेचे आहे. असे बरेच उदाहरणं आहेत ज्याच्या आजोबाला शंभर एकर शेती, नौकर चाकर होते पण वर्तमानात नातवंडं एखाद्या ठिकाणी काम करून उपजीविका भागवत आहेत हे एक कटू सत्य आहे. पालकांनी आपल्या मुलांना सामाजिक, आर्थिक जाणीव करून देणं हिताचं ठरतं न की त्याला मागेल ते लाड पुरवत आळशी तथा निरूपयोगी बनवनं..
गुजरातचे प्रसिद्ध उद्योगपती सावजी ढोलकीचा यांचे नाव तुम्ही नक्कीच ऐकले असेल.अब्जाधीश गडगंज श्रीमंती असणारे हिरे व्यवसायाचे मालक सावजी ढोलकीया आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून फ्लॅट आणि महागड्या गाड्या देण्यासाठी चर्चेत असतात.पण स्वतःच्या मुलाला वयाच्या 21 व्या वर्षी द्रव्य ढोलकीय याला महिनाभर स्वतःच्या कष्टाने जगा म्हणून काही 4-5 हजार रुपये दिले.वडिलांची ओळख कुणाला सांगायची नाही,8 दिवसापेक्षा अधिक काळ एकाच आस्थापनात काम करायचं नाही आणि कुणी काम दिलेच नाहीत तर शेवटी या पाच हजार रुपयातून दोन वेळ जेवण करू शकतास असे म्हणून मुलाला अनुभव घेण्यासाठी दुसऱ्या अज्ञात शहराला पाठवले. मुलगा द्रव्यसाठी ही जणू अग्नी परीक्षा होती. 60 वेगवेगळ्या ठिकाणातून त्याला नाकारले वेळप्रसंगी मोलमजुरी केली. पण या अनुभवाने त्याला चिकाटीचे मूल्य आणि पैश्याचे व नौकरीचे महत्व प्राप्त झाले.हे आपल्या भागातील पालकांना समजणार का..? विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो आणि पालकांनो आपना सर्वाना माझी कळकळीची विनंती आहे वडिलांच्या पैश्याचं चीज करा. आई बाबांची मान कायम ताठ कशी राहील? याचा विचार आपण नेहमी करायला हवं. संधीचे सोने करा.रील्स पाहत वेळ घालवल्याने तुम्हाला नेमकं काय फायदा होणार आहे.? अभ्यासावर लक्ष केंद्रित करून चिकाटीने सातत्य ठेवून अभ्यासात रमा.. वेळ भेटलाच तर अवांतर वाचन करा, एक जबाबदार नागरिक बना.नेहमी सकारात्मक राहून,आपल्या हातून घडलेल्या चुकामधून शिकून, ध्येय बाळगून ध्येयप्राप्तीसाठी कष्ट करण्याची सवय अंगीकारा.
उर्वरित…. पुढील भागात.. लवकरच भाग 2