शरीरावर गंभीर जखमा,,

अहिल्यानगर – अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात कल्याण निर्मळ राष्ट्रीय महामार्गावरील करंजी घाटामध्ये बुधवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास दगडवाडी फाट्या जवळील धोकादायक वळणाच्या जवळ एका अज्ञात महिलेचा मृतदेह असल्याची माहिती पाथर्डी पोलीस स्टेशनला समजली त्यानंतर पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक संदीप ढाकणे तात्काळ घटनास्थळी पोहोचले. संबंधित महिला अंदाजे 35 वय वर्षाची असून वरखेड तालुका पाथरी जिल्हा परभणी येथील असल्याचे समजले असून या महिलेचा करंजी घाटात घातपात झाला असावा असा मोठा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून त्या दृष्टीने पोलिसांची तपासाची चक्रे फिरले असून ज्या महिलेचा मृतदेह करंजी घाटाच्या डोंगरात आढळला त्या महिलेच्या अंगावर गंभीर जखमा असून आरोग्य विभागासह फॉरेनसीक लॅब पथक देखील घटनास्थळी दाखल झाले असून पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली या महिलेच्या मृत्यूबाबत पोलिसांच्या तपासातून लवकरच सत्य बाहेर येण्याची शक्यता आहे.पोलिसांनी घटनास्थळाची परिस्थिती पाहता या महिलेचा घातपात झाला असल्याचीच शक्यता पोलीस प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे.करंजी घाटात महिलेचा मृतदेह आढळल्याची माहिती समजताच करंजी परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
प्रतिनिधी :–
भिवसेन टेमकर Ntv न्यूज मराठी पाथर्डी,अहिल्यानगर.
