महानगरपालिका जप्ती कारवाई तीव्र करणार, थकबाकीदारांना जप्तीच्या नोटिसा बजावण्यास सुरुवात

थकबाकीदार मालमत्ताधारकांनी सवलतीचा लाभ घेऊन तात्काळ कर भरावा : आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे

अहिल्यानगर – महानगरपालिकेने मालमत्ता कर व पाणीपट्टीच्या थकबाकी वसुलीसाठी विशेष मोहीम सुरू केली आहे. थकबाकीदार मालमत्ताधारकांना जानेवारी अखेरपर्यंत शास्तीमध्ये १०० टक्के सवलत देण्यात आलेली आहे. आत्तापर्यंत सुमारे ४७०० थकबाकीदारांनी याचा लाभ घेतला असून त्या माध्यमातून ४.६० कोटींची वसुली झालेली आहे. थकबाकीदारांकडून थंड प्रतिसाद असल्याने महानगरपालिकेने जप्ती कारवाई सुरू केली आहे. शास्तीमध्ये १०० टक्के सवलत घेण्यासाठी अखेरचे तीन दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे थकबाकीदार मालमत्ताधारकांनी सवलतीचा लाभ घेऊन तात्काळ थकीत कराचा भरणा करावा व जप्तीची कारवाई टाळावी, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासन यशवंत डांगे यांनी केले आहे.

महानगरपालिका प्रशासनाने ८ जानेवारी पासून ३१ जानेवारी पर्यंत मालमत्ता करा वरील शास्तीमध्ये शंभर टक्के सवलत दिलेली आहे या काळात ८.१८ कोटींची वसुली झाली आहे. त्यातील ३.५८ कोटी रुपये शास्ती माफ करण्यात आली असून, ४.६० कोटी रुपये वसूल झाले आहेत. केडगाव येथील मनपाच्या भाग्योदय शॉपिंग सेंटर येथील गाळेधारकांचे १५.५० लाख रुपये थकीत गाळे भाडे वसूल झाले आहे. अद्यापही २०६ कोटींची थकबाकी आहे. सुमारे ७५ हजार थकबाकीदारांनी कर भरलेला नाही. शास्तीमध्ये १०० टक्के सवलत घेण्यासाठी अखेरचे तीन दिवस शिल्लक राहिले आहेत. थकबाकीदारांकडून थंड प्रतिसाद मिळत असल्याने महानगरपालिकेने जप्ती कारवाईची मोहीम हाती घेतली आहे.

झेंडीगेट प्रभाग समिती कार्यालय अंतर्गत असलेल्या थकबाकीदारांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळालेला आहे. या प्रभागातील वसुली अत्यंत कमी आहे. त्यामुळे थकबाकीदारांना जप्तीच्या नोटीस बजावण्यास सुरुवात करण्यात आली आहे. थकबाकीदार मालमत्ताधरकांनी शास्तीमध्ये १०० टक्के सवलत घेण्यासाठी अखेरचे तीन दिवस शिल्लक राहिले असल्याने तात्काळ सवलत घेऊन थकीत कराचा भरणा करावा, अन्यथा महानगरपालिकेकडून कारवाई करण्यात येईल असा इशारा आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *