♦️बोल्हेगाव परिसरातील पुलाखालील पत्र्याच्या शेडला अचानक आग लागली. या आगीत सुमारे दहा लाखांचे नुकसान झाले असल्याचा अंदाज व्यक्त होता आहे. शुक्रवारी (ता. ३१) रोजी सुमारे तीन वाजेच्या दरम्यान ही घटना घडली.बोल्हेगाव येथील कॉटेज कॉर्नर परिसरात सुरेश पंडित व अल्फाताप शेख याचे ए. आय. मोटर्स नावाचे गॅरेज आहे. आज शुक्रवारी अचानक या गॅरेज आग लागली. या घटनेची माहिती मिळताच महापालिकेचे अग्निशमन विभागाचे एका वाहन घटनास्थळी होत आगीवर नियंत्रण मिळविले. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. यावेळी अग्निशमन विभागाचे फायरमन शिवाजी गायकवाड, संदीप शिरसाठ, अमोल कर्हाडे, मच्छिंद्र धोत्रे आदी कर्मचारी उपस्थित होते.