DHARASHIV | ता.१८ कळंब तालुक्यातील दुधाळवाडी येथील केंद्रीय व राज्य राखीव दलात भर्ती झालेल्या दोन तरुणांची डीजे लावुन मिरवणूक काढुन,गावभर पेढे वाटून ग्रामपंचायतच्या वतीने आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते जंगी नागरी सत्कार सोमवारी (ता. १७) संध्याकाळी करण्यात आला.
कळंब तालुक्यातील दूधाळवाडी हे गाव दुधाच्या व्यवसायावर उदरनिर्वाह करणारे सातशे लोकसंख्या असलेले, इनमीन दोन अडीचशे उंबऱ्याचे, चारी दिशेने डोंगराने वेडलेले गाव. गावाला असलेला शिवार मुरमाड जमिनीचा,गेल्या वर्षी एक साठवण तलाव झाल्याने कांही अंशी जमीन सिंचनाखाली आली असुन उर्वरित सिंचनाची कामे चालु असली तरी कायम दुष्काळ सदृष्य स्थितीवर मात करण्यासाठी सबंध गावाचा दुधापासून खवा तयार करण्याचा व्यवसाय . म्हणजे सतत तेजी मंदीच्या विवंचनेत उदरनिर्वाह करण्याऱ्या दुधाळवाडी गावातील दुग्धव्यवसायिकांची दोन मुलं केंद्रीय आणि राज्य राखीव पोलिस दलात भर्ती झाल्याचे कौतुक,कुतूहल एवढे की गावात रस्त्यावर,हायवेवर त्यांच्या अभिनंदनाचे फ्लेक्स लावले तर त्यांच्या पोलीस दलात रुजू होण्याच्या पूर्व संध्येला गावात त्यांची डीजे लावुन मिरवणूक काढुन गावभर पेढे वाटून जंगी नागरी सत्काराचे आयोजन सोमवारी रात्री करण्यात आले होते. कळंब – धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांच्या उपस्थितीत दुधाळवाडी गावचे अमर विकास लाटे यांची राज्य राखीव पोलीस दलात व वैभव विजय सोन्नै यांची केंद्रीय राखीव पोलीस दलात निवड झाल्याबद्दल नागरी सत्कार करण्यात आले. हा कार्यक्रम दुधाळवाडी गावच्या सरपंच सविता सिरसाठ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला . या कार्यक्रमाला माजी पं.स.सदस्य
रामहरी मुंडे येरमाळा पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन बारकुल विभाग प्रमुख राहुल पाटील, हरिचंद्र लाटे,बालाजी लाटे, आप्पा दुधाळ,प्रशांत लुंगारे, बिभीषण बांगर,रविकांत लाटे ,विजय सोने,रमेश दुधाळ, अनिल दुधाळ,कैलास लुंगारे, योगेश लुंगारे,पंकज घुगे, लक्ष्मण भांगे ,तानाजी खंडागळे ,शिवाजी खंडागळे, मिलन शिरसाट, जयराम शिरसाट ,केरबा शिरसाट, सूर्यानंद भांगे, व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .
या नागरीसत्काराचे आयोजन भिवाजी सिरसाठ, ग्रामपंचायत सदस्य गोंविद मुंडे यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमोल लाटे यांनी केले सूत्रसंचालन डॉ. निलेश लाटे यांनी केले तर आभार गोविंद मुंडे यांनी मानले.
येरमाळा प्रतिनीधी (सुधीर लोमटे)