ढगेज् इंग्लिश अकॅडमीचे आयोजन ; 1500 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी नोंदविला सहभाग
लातूर : ढगेज् इंग्लिश अकॅडमीच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी ज्युनिअर ग्रामर महागुरू व सीनियर ग्रामर महागुरु स्पर्धा परीक्षा घेण्यात आली होती. या स्पर्धा परीक्षेमध्ये लातूर जिल्ह्यातून 1500 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. नुकताच या स्पर्धा परीक्षेचा निकाल घोषित करण्यात आला. बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला.

या बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ढगेज् इंग्लिश अकॅडमीचे प्रमुख प्राचार्य व्यंकटराव ढगे तर प्रमुख अतिथी म्हणून लातूर शहर पोलीस उपविभागीय अधिकारी सावंत साहेब, तसेच माजी नगरसेवक तथा युवा नेते अजित कव्हेकर, प्राचार्य निलेश राजेमाने, पत्रकार शशिकांत पाटील, साहित्यिक प्रा. विवेक सौताडेकर, प्रा सचिदानंद ढगे, प्रा. विवेकानंद ढगे, प्रा.संभाजी नवघरे, प्रा. शिवलिंग नागापुरे सर, आदींसह उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. विवेकानंद ढगे यांनी केले. उपस्थित सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे महत्त्व आणि गरज या विषयावर सखोल असे मार्गदर्शन केले.

प्रमुख अतिथींच्या हस्ते इंग्लिश महागुरु स्पर्धा परीक्षेतील विजेत्या स्पर्धकाना बक्षीस वितरण समारंभ पार पडला. यावेळी प्रथम, द्वितीय, तृतीय तसेच उत्तेजनार्थ स्वरूपात विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमासाठी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी इंगळे सर, सुबोध, अमर, घोलप, यांच्यासह सर्व ढगेज् अकॅडमीच्या स्टाफने,परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संभाजी नवघरे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. सचिदानंद ढगे सर यांनी केले.