यावेळी अँड. व्यंकट बेद्रे यांनी गेली पंधरा वर्षे आयुक्तालयासाठी कृती समितीच्या माध्यमातून केवळ लातूरंच नव्हे धाराशिव व बीड जिल्ह्यातील नागरिकांनी न्याय हक्कासाठी लढा दिला आहे. आयुक्तालय स्थापने मुळे जिल्ह्या जिल्ह्यात वादंग निर्माण होण्याऐवजी सामंजस्याने मार्ग काढण्यासाठी मी प्रयत्न करेन, असे डॉ. शिवाजी काळगे यांनी कृती समितीस आश्वासित केले. या शिष्टमंडळात माजी आमदार वैजनाथ शिंदे , अँड. व्यंकट बेद्रे, भाई उदय गवारे, अशोक गोविंदपुरकर, मोईज शेख, चंद्रकांत चिकटे, प्रा. अनंत लांडगे, डॉ. बी. आर. पाटील, संजय मोरे, विश्वंभर भोसले, प्रा. दत्ता सोमवंशी, अँड. वसंत उगले, अँड. विजय जाधव, आप्पा मुंडे , तसेच लातूर जिल्हा वकील मंडळाचे नवनिर्वाचित पदाधिकारी अँड योगेश जगताप, अँड. संजय जगदाळे, अँड गणेश गोजमगुंडे, अँड अभिलाषा गवारे, अँड. निलेश मुचाटे, अँड. गणेश कांबळे आणि अँड. प्रदीप गंगणे, अँड. सचिन पंचाक्षरी, अँड. आदिमाया गवारे, अँड. निखिल काळगे, अँड. सुरज विभुते, सन्मुख गोविंदपूरकर, दत्ता लोभे आदी जण उपस्थित होते.