लातूर : बौद्ध साहित्य संमेलनाला शासनाचे अनुदान मिळवून देण्याचा प्रयत्न करेन, असे सांगतानाच लातूर शहरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर पार्कवरील डॉ. आंबेडकरांच्या ७२ फुटी रखडलेल्या पुतळ्याचे काम पूर्ण करण्याची ग्वाही माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांनी दिली.
लातूर येथील बौद्ध साहित्य संमेलनात ते बोलत होते. यावेळी विचार पिठावर साहित्यिक उत्तम कांबळे, ज्येष्ठ पत्रकार जयप्रकाश दगडे, स्वागताध्यक्ष चंद्रकांत शिंदे, संयोजक डॉ.राजेंद्र कांबळे, यू.डी. गायकवाड, प्रा डॉ. शिवाजीराव गाढे उपस्थित होते.
यावेळी बोलताना साहित्यीक कांबळे म्हणाले की, वेगवेगळ्या धर्मात दुःखाची कारण सांगितलेली आहेत परंतु बौद्ध धर्मात बुद्धांनी मात्र दुःखमुक्तीचे कारण सांगितले आहे. प्रत्येक जन्माला आलेला व्यक्ती हा मरणानंतर मुक्त होतो हेही त्यांनी सांगितलेले आहे. बाबासाहेबांनी दीक्षा दिल्यानंतर आपण खरंच बौद्ध झालो आहोत का याचंही आत्मचिंतन करण्याचा सल्ला साहित्यिक उत्तम कांबळे यांनी दिला.

जग हे दुःखाने भरले आहे. या दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग हा तथागत गौतम बुद्धांनी दाखवला आहे. जन्माला येणारा प्रत्येक जण हा मृत्यूनंतर मुक्त होतो आणि हेच मुक्तीचे कारण असल्याचं बुद्धांनी सांगितले असल्याचे प्रतिपादन साहित्यिक उत्तम कांबळे यांनी बौद्ध साहित्य संमेलनात केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संयोजन समितीचे अध्यक्ष चंद्रकांत शिंदे व सर्व सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.