जामखेड. केरळ तिरू अनंतपुरम मध्ये दिनांक 13 ते 16 फेब्रुवारी 2025 रोजी आयोजित 49 व्या इंटरनॅशनल योगा स्पोर्ट्स चॅम्पियनशिप येथे झालेल्या स्पर्धेत जामखेड तालुक्यातील बावी येथील सीमा सुधीर पवार यांना नॅशनल मध्ये ब्रांझ पदक मिळाले असून या वर्षा अखेरीस सिंगापूर येथे होणाऱ्या इंटरनॅशनल योगा स्पोर्ट्स चॅम्पियनशिप साठी निवड झालेली आहे. या आधी पुणे जिल्हा पातळीवर प्रथम आल्या नंतर गोल्ड मेडल, स्टेट लेवल को कॉम्पेटकशन आळंदी पुणे येथे महाराष्ट्र योगा एकसोसिएशन यांनी दिनांक 14 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर 2024 रोजी आयोजित केलेली त्यामध्ये प्रथम गोल्ड मेडल मिळालेले आहे त्यानंतर केरळ, तिरू अनंतपुरम मध्ये दिनांक 13 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी 2025 रोजी आयोजित एकूण 49 व्या इंटरनॅशनल योगा स्पोर्ट्स चॅम्पियनशिप मध्ये झालेल्या स्पर्धेत सीमा सुधीर पवार राहणार बावी तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर यांना वयोगट ग्रुप 30 ते 40 मध्ये 50 स्पर्धकाबद्दल नॅशनल मध्ये तृतीय क्रमांक प्राप्त करत ब्रांझ पदक मिळाले आणि या वर्षाखेरीस सिंगापूर येथे होणाऱ्या इंटरनॅशनल योगा स्पोर्ट्स चॅम्पियनशिप साठी निवड झालेली आहे. यामध्ये योग गुरु चंद्रकांत पांगारे यांचे मार्गदर्शन लाभले.
नंदुसिंग परदेशी
जिल्हा प्रतिनिधी अहिल्यानगर
मो नं 9765886124