YAWATMAL | महागाव येथील तहसिलदार अभय मस्के व विजय व्यंकटराव बेलेवाड विस्तार अधिकारी शिक्षण (परीरक्षक डि.सि ०६५ गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर टाकरस महागांव यानी आदर्श विद्यालय कोठारी ता.महागांव जि. यवतमाळ येथे १० वी चे केंद्राची पाहणी केली असता, परिक्षा केंद्राच्या सभोवताली लोकांची गर्दी दिसुन आली. व त्यानंतर व्हॉटसप वर प्राप्त झालेला फोटो च्या अनुषंगाने केंद्रसंचालक नामे शाम कान्होजी तास्के यांच्या कार्यालयात पाहणी केली असता, तेथील कार्यालयातील पार्टीशन केलेल्या लगतच्या रुम मध्ये पाहिले, व्हॉटसपवर आलेल्या फोटो मधील खालच्या भागाशी मिळता जुळता पृष्टभाग सदरील रुममध्ये पाहावयास मिळाला, या संदर्भात केंद्रसंचालकांशी विचारणा केली असता, त्यानी असा प्रकार आमच्या कडे झालेला नाही. असे त्यानी सांगितले. परंतु तेथील उपस्थितीत विद्यार्थी एकुन २२१ असल्यांने, प्रश्नपत्रिकेच्या गठ्यातील शिल्लक राहिलेले चार प्रश्नपत्रिका पैकी एक प्रश्नपत्रिका चोळा मोळा केलेली आढळुन आली व उर्वरित तिन प्रश्न पत्रिका जसाच्या तशा असल्यांचे निदर्शनास आले. यावरुन पेपर लिक केल्यांचे स्पष्ट झाले.

केद्रसंचालक शाम कान्होजी तास्के यांची शासनाने १० वीच्या बोडाच्या परिक्षेसाठी आदर्श विद्यालय कोठारी येथे केंद्रसंचालक यानी नेमणुक केलेली होती. त्यानी सदर परिक्षेच्या प्रश्न पत्रिका त्याच्या ताब्यात असुन, सुध्दा त्यानी सदर मराठी प्रथम भाषा ०१ चा पेपर जनतेमध्ये मोबाईल व्दारे प्रसिध्द करुन इतर व्यक्तीना पुरविला आहे. तसेच आमच्या वरिष्ठाकडून माहीती मिळाली की, मोबाईल क्रमांक -९४०५११९७५२ या नंबर वरुन सुध्दा सदरचा मराठी विषयचा पेपर जनतेमध्ये १० वीच्या बोर्डाची परिक्षा सुरु असतांना, प्रश्न पत्रिका प्रसिध्द करण्यास मनाई असतांना, सुध्दा त्यानी मोबाईलव्दारे प्रसिध्द केले असल्याने पोलिसात तक्रार दाखल केली
महागांव प्रतिनिधी
निलेश नरवाडे .