प्रशासन सतर्क, नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचना जारी

फुलचंद भगत
वाशिम:-वाशिम जिल्ह्यातील मौजे खेर्डा (जिरापुरे), ता. कारंजा येथील एका पोल्ट्री फार्ममध्ये बर्ड फ्ल्यूची बाधा आढळून आली आहे. मृत कोंबड्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवले असता त्यात संसर्गाची पुष्टी झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्याचे आदेश दिले आहेत.त्या अनुषंगाने दि.१ मार्च रोजी मंगरुळपीर येथील तहसिल कार्यालयातील सभागृहात बर्ड फ्लु बाबत जनजागृतीसाठी बैठक आयोजीत करण्यात आली होती.या बैठकीमध्ये तहसिलदार शितल बंडगर,सहा.पशुसंवर्धन विभागाच्या सहा.आयुक्त डाॅ.निता गोडबोले,भुमिअभिलेख ऊपअधिक्षक कलावती जाधव,एपिआय वाघमोडे या अधिकार्‍यांनी माहीती देत विविध सुचनांचे पालन करण्याचे सुचित केले.
दि.१ मार्च रोजी मंगरुळपीर येथील तहसिल कार्यालयामध्ये बर्ड फ्लुबाबत जनजागृती बैठक पार पडली यामध्ये या आजाराविषयी सतर्कता,ऊपाययोजना याविषयी आढावा घेत आवश्यक त्या सुचना मान्यवरांनी दिल्या.या बैठकीमध्ये तहसिलदार,पशुसंवर्धन विभागाच्या सहा.आयुक्त,एपिआय,भुमीअभिलेख अधिक्षक यासह तलाठी,ग्रावविकास अधिकारी,ग्रामसेवक,महसुल अधिकारी,पोलीस पाटील,कोतवाल,पोल्र्टी फाॅर्म चालवणारे,पञकार यांची ऊपस्थीती होती.

बर्ड फ्ल्यूचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाच्या महत्त्वाच्या सूचना

स्वच्छता व आरोग्यदायी उपाययोजना: पोल्ट्री फार्म स्वच्छ ठेवणे आणि जैवसुरक्षा नियमांचे पालन करणे आवश्यक.

लक्षणे दिसल्यास तत्काळ माहिती द्या: पक्ष्यांमध्ये अचानक मृत्यू, श्वास घेण्यास त्रास, सुस्तपणा यांसारखी लक्षणे आढळल्यास त्वरित नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा.

बाधित पक्ष्यांची वाहतूक टाळा: संसर्ग रोखण्यासाठी बाधित पोल्ट्री पक्ष्यांची ने-आण करण्यास सक्त मनाई.

स्थानांतरीत व वन्य पक्ष्यांवर लक्ष ठेवा: स्थलांतरीत पक्षी, कावळे किंवा अन्य वन्य पक्षी मृत आढळल्यास तत्काळ अधिकाऱ्यांना माहिती द्यावी.

फवारणी करणे आवश्यक: ग्रामपंचायतीमार्फत १ लिटर पाण्यात ७ ग्रॅम धुण्याचा सोडा मिसळून पोल्ट्री शेड, गोठे, गटारे, नाल्यांवर फवारणी करावी. हे दर १५ दिवसांनी तीन वेळा करण्यात यावे.

बर्ड फ्लू म्हणजे नक्की काय?; वेळीच व्हा सावध, जाणून घ्या लक्षणं आणि कारणं

‘बर्ड फ्लू’ हा आजार एवियन इन्फ्लूएंजा वायरस H5N1 मुळे होतो. हा वायरस पक्षी आणि माणसांना आपलं शिकार बनवतो. बर्ड फ्लू इन्फेक्शन चिकन, टर्की, मोर आणि बदक यांसारख्या पक्ष्यांमुळे पसरतो. हा इन्फ्लूएंजा वायरस फार धोकादायक असून यामुळे पक्ष्यांसोबतच माणसांचाही मृत्यू होण्याचा धोका असतो.बर्ड फ्लूच्या लक्षणांबाबतची माहिती प्रत्येकाला होणं आवश्यक आहे. कारण काही लोक बर्ड फ्लूचे शिकार असतात आणि त्याला साधारण तार समजून उपचार करत असतात. आतापर्यंत ब्लड फ्लूचं मुख्य कारण पक्षांनाच मानलं जातं. पण अनेकदा हा आजार माणसांकडून माणसांमध्येही पसरतो.

बर्ड फ्लूची लक्षणं

बर्ड फ्लूची लक्षणं साधारण तापासारखीच असतात. परंतु, बर्ड फ्लू झालेल्या लोकांना श्वसनाच्या अनेक समस्यांसोबतच सतत उलट्या होण्याची समस्याही उद्भवते. या आजारांमध्ये इतर लक्षणं ही साधारण असतात.

ताप
छातीमध्ये कफ होणं
नाक वाहणं
डोकेदुखी
घशामध्ये सूज येणं
स्नायूंना वेदना होणं
सांधेदुखी
पोटाच्या समस्या
सतत उलट्या होणं
अस्वस्थ वाटणं
श्वसनासंदर्भातील विकार
न्युमोनिया
डोळ्यांच्या समस्या

का होतो बर्ड फ्लू?

सामान्यतः माणसांमध्ये हा आजार कोबड्यांमुळे किंवा बर्ड फ्ल्यू झालेल्या पक्ष्यांच्या सानिध्यात आल्यामुळे होतो. एखाद्या पक्ष्याला हा आजार झाला असेल आणि तुम्ही कोणत्याही प्रकारे त्याच्या सानिध्यात आलात तर हा आजार तुम्हालाही होऊ शकतो. माणसांमध्ये बर्ड फ्लू या गंभीर आजाराचा वायरस डोळे, नाक आणि तोडांमार्फत प्रवेश करतो.

असा करा बचाव

बर्ड फ्लू झालेल्या पक्ष्यांपासून दूर रहा.- एखाद्या पक्ष्याचा मृत्यू झाला असेल तर त्याच्यापासून लांब रहा.- बर्ड फ्लूची साथ आली असेल तर नॉन व्हेज खाणं टाळा.- नॉन व्हेज खरेदी करताना स्वच्छ असल्याची खात्री करून घ्या. – बर्ड फ्लूची साथ असलेल्या ठिकाणी जाऊ नका किंवा मास्क लावून जा.

बर्ड फ्लूवर उपचार

बर्ड फ्लूवर उपचार म्हणून एंटीवायरल ड्रग ओसेल्टामिविर (टॅमीफ्लू) (oseltamivir (Tamiflu) )आणि जानामिविर (रेलेएंजा) (zanamivir (Relenza)) परिणामकारक ठरतं. हा वायरस कमी करण्यासाठी लागण झालेल्या व्यक्तीने पूर्णपणे विश्रांची घेणं गरजेचं असतं. तसेच हेल्दी डाएट घेणं गरजेचं असतं ज्यामध्ये द्रव्यस्वरूपातील पदार्थांचा जास्त समावेश असेल. बर्ड फ्लूची लागण इतर लोकांना होऊ नये म्हणून बाधा झालेल्या रूग्णाच्या संर्कात येणं टाळा.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *