फुलचंद भगत
वाशिम:-दि.२७.०२.२०२५ रोजी दुपारी एक अल्पवयीन मुलगी कंम्प्युटर क्लास करुन मामाचे घरी पायी जात असतांना शिवाजी शाळा रिसोडच्या काही अंतरावर एक वयस्क अनोळखी इसम तिला भेटला व म्हणाला की, तो तिचे पप्पाचा मावस भाउ आहे, तुझे मामाला सुध्दा ओळखतो तु माझी मुलगी शितलला ओळखते का, पिडीतेने ओळखत नाही म्हणाल्यावर आरोपीने माझी मुलगी शितल आताच माझे शेतातील घरी गेली आहे तु माझे सोबत चल मी माझे मुलीची ओळख करुन देतो असे म्हणुन आरोपीने पिडीतेला ॲटो भाडयाने करुन सवड गावाचे अलीकडे शेतात नेले, पिडीतेला गळा कापुन मारण्याची धमकी देवुन जबरदस्तीने शारीरीक संबंध केला. वगैरे बाबी नमुद असलेल्या पिडीतेच्या फिर्यादवरुन दि.२८.०२.२०२५ रोजी पोलीस स्टेशन रिसोड अप.नं. १०१/२५क.६४,६४,(२)(i), ९६,१३७(२),३५१(२) भान्यासं सह कलम ४, ६ पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर घटनेची गंभीरता लक्षात घेता मा. पोलीस अधीक्षक श्री. अनुज तारे, मा. अपर पोलीस अधीक्षक मॅडम, मा.उप विभागीय पोलीस अधिकारी, पो.नि. स्थानिक गुन्हे शाखा, पो. नि. रिसोड व इतर असे सर्व अधिका-यांनी स्टाफसह तात्काळ घटनास्थळ गाठुन विनाविलंब तपासाकरीता वेगवेगळया टिम तयार केल्यात. सर्व प्रथम आरोपी हा मुलीच्या ओळखीचा नसल्याने आरोपीची ओळख पटविण्याचे पोलीसांसमोर मोठे आव्हाण होते. रिसोड शहरातील घटनेच्या मार्गावरील cctv फुटेज प्राप्त करुन त्याचे विश्लेषन केले. त्याआधारे पोलीस तपासाचे विशेष कौशल्य पणाला लावुन आरोपीची ओळख पटविण्यात आली.
आरोपीची ओळख पटताच स्थानिक गुन्हे शाखा, पोलीस स्टेशन रिसोड, मालेगाव, शिरपुर, जउळका असे आरोपी शोध पथक तयार करून आरोपीचा शोध घेणे करीता सर्व पथके वेगवेगळया भागात आरोपी शोधण्याकरीता रवाना करण्यात आली. आरोपी शोधण्यासाठी त्याचे मुळगाव, शेतशिवार आजुबाजुचे गावे, डोणगाव, मेहकर, बुलढाणा आणि अकोला जिल्हयातील आरोपीचे नातेवाईक राहत असलेले गाव पारसिंगी, राजेगाव, अंजनी व इतर गावे आरोपी शोध पथकांनी रात्रभर पिंजुन काढली सर्व अधिकारी व अंमलदार न थकता अथक परीश्रम घेत होते. हॉटेल, लॉजेस, बार, मंदीरे, आश्रयस्थाने, बसस्थानके व संशयीत ठिकाणे चेक करण्यात आली. मिळतील त्या त्या ठिकाणचे cctv फुटेज घेण्याचे व त्यांचे विश्लेषन करण्याचे काम सतत चालुच होते.सायबर सेलचे मदतीने सर्व तपास पथकांची माहिती संकलीत करण्यात आली, त्याचे कौशल्यपुर्ण तांत्रीक विश्लेषन करुन आरोपी अहमद नगर येथे असल्याबाबत खात्री झाल्याने तात्काळ तपासाची चक्रे फिरवुन आरोपी नामे तुकाराम सखाराम कांबळे, रा. जोगेश्वरी यास विनाविलंब ताब्यात
घेतले.सदर गुन्हयाचा तपास मा. श्री रामनाथ पोकळे, विशेष पोलीस महानिरीक्षक, अमरावती, मा. श्री अनुज तारे, पोलीस अधिक्षक, मा. श्रीमती लता फड, अपर पोलीस अधिक्षक, श्री नवदीप अग्रवाल उप विभागीय पोलीस अधीकारी यांचे मार्गदर्शनात पोनि स्थागुशा रामकृष्ण महल्ले, पोनि भुषन गावंडे, सपोनि अमोल पुरी, लसंते, धोत्रे, अघाव, हिवरकर, गायकवाड पोउपनि गोखले, नागरे, राजपुत यांचेसह पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेचे सर्व अंमलदार यांनी केला. पोलीसांनी रात्रंदिवस न थांबता अथक परिश्रम घेवुन केलेल्या तांत्रीक तपासामुळेच गुन्हातील अज्ञात आरोपीची ओळख पटवुन आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत वरीष्ठ पातळीवर सुध्दा दखल घेण्यात आली.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206