फुलचंद भगत
वाशिम:-यहोवा यिरे फाऊंडेशन तर्फै जेष्ठ नागरिक संघ कार्यालय रामनगर चंद्रपूर येथे अंतराष्ट्रीय जागतिक महिला दिनानिमित्त महिला नेतृत्त्व व कामगिरी पुरस्कार व बैकीग क्षेत्र प्रशिक्षण ठेवण्यात आले होते.त्या मध्ये उपस्थित ३०० महिला पुरूष उपस्थित होते त्या मधुन २६ महीला सामाजिक कार्यात सत्तत व उद्योग मध्ये असणाऱ्या महीलांना महीला नेतृत्त्व व कामगिरी पुरस्काराच्या मानकरी ठरल्या त्याना सन्मान चिन्ह व सर्टीफिकेट देऊन सन्मानित करण्यात आले व तसेच यहोवा यिरे फाऊंडेशन चे सिईओ डाॅ.रमेशकुमार बोरकुटे साहेबानी (शिका,कमवा व प्रगती करा ) या माध्यमातून ८२ युवक युतीना नियुक्तीपत्र पञ देऊन बैकीग क्षेत्रात नोकऱ्या मिळवून दील्या व सहाय्यक आयुक्त श्री.भैय्याजी येरणे साहेबानी महीला पुरूष उधोगजकता ना उधोग प्ररीक्षण माध्यमातून व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन केले. व यहोवा यिरे फाऊंडेशन च्या अध्यक्ष कु.एलिजा बोरकुटे यांनी
महत्वपूर्ण उधोगजक महिलान साठी एक संदेश दिला आहे.महिला उद्योजकता ही एक महत्त्वाची सामाजिक आणि आर्थिक शक्ती आहे. महिला उद्योजक समाजात नवीन संधी निर्माण करतात, रोजगार निर्माण करतात आणि आर्थिक विकासाला चालना देतात. महिला उद्योजकांना अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागते, ज्यात आर्थिक अडचणी, सामाजिक दबाव आणि लिंगभेद यांचा समावेश होतो. तथापि, महिला उद्योजक या आव्हानांना तोंड देत आहेत आणि व्यवसाय जगात आपला ठसा उमटवत आहेत.आणी सत्तत कार्य कर असतात.अशा महीलाना महीला नेतृत्त्व व कामगिरी पुरस्कार चा मानाचा मुजरा.

या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक आयुक्त जि.कौ.वि.रो.व उधो.मार्ग.के.चंद्रपुर चे मा.श्री.भैयाजी येरमे,बैकीग प्रशिक्षक नागपूर मा.श्री.विवेकानंद चंदनखेडे,प्रकल्प अधिकारी महाराष्ट्र उधोगजक विकास केंद्र चंद्रपुर चे मा.श्री.संदिप जाने,अंतराष्ट्रीय महिला मानवाधिकार एंव अपराध नियंञन परीषद चे महाराष्ट्र सचिव मा.डाॅ.रमेशकुमार बोरकुटे, शिक्षण विभाग समुपदेशक वर्धा च्या सौ.डाॅ.रत्ना चौधरी,सुतार समाज सामाजिक कार्यकर्त्या व सखी मंच च्या अध्यक्ष सौ.कल्पना शाञकार, यहोवा यिरे फाऊंडेशन चंद्रपूर च्या अध्यक्ष कु.एलिजा बोरकुटे,सौ.मर्सी फ्रांसिस कुमार (प्रिंसीपल)सेंट फ्रांसिस स्कूल,चंद्रपूर व समस्त पाहुण्यांसह व यहोवा यिरे फाऊंडेशन टिम च्या उपस्थित कार्यक्रम पार पडला.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206