3,43,000/- रु. चा मुद्देमाल जप्त

फुलचंद भगत
वाशिम:-समाजात शांतता व सुव्यवस्था राहावी त्याचबरोबर अवैध धंदयावर प्रतिबंध व्हावा यासाठी वाशिम जिल्हा पोलीस दलात तर्फे सतत कार्यवाही सुरु असतात त्याच पार्श्वभुमीवर वाशिम जिल्हयात अवैधरित्या चालत असलेल्या जुगार अंडयांना पायबंद घालण्याकरिता जिल्हयात विशेष मोहिम राबविण्यात आली.त्या अनुषंगाने दिनांक 09/05/2025 रोजी मा. नवदीप अग्रवाल (भा.पो.से.) सहाय्यक पोलीस अधीक्षक उपविभाग वाशिम चार्ज मंगरुळपीर यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी वाशिम व मंगरुळपीर येथील कार्यालयीन स्टॉफसह पो.स्टे. मंगरुळपीर हद्दीतील ग्राम शेलुबाजार ता. मंगरुळपीर जि. वाशिम येथे शिवकमल बार ॲन्ड रेष्टारंटचे वरील पहील्या मजल्यावर अवैध वरली मटका, जुगार पैसाचे हारजितवर चालणा-या जुगारावर रेड करुन नगदी 102,380/- रुपये 02 मोटर सायकल, 09 मोबाईल व जुगार साहीत्य असा एकुण 3,43,520/- रुपयाचा मुददेमाल जप्त केला आहे.
आरोपी 1.विशाल विलास चौधरी वय 35 वर्षे रा. शेलुबाजार 2. शरद अनंतराव बोबडे वय 55 वर्षे रा. शेलुबाजार 3. मारोती सिताराम टोंचर वय 60 वर्षे रा. शेलुबाजार 4. बापूराव प्रभाकर चव्हाण वय 52 वर्षे रा. शेलुबाजार 5. दिलीप रामभाऊ हिवरे वय 55 वर्षे रा. शेलुबाजार 6 विनोद किसन मनवर वय 41 वर्षे रा.लाठी 7. बाळू तुळशीराम ठाकरे वय 55 वर्षे रा. पार्डीताड 8. दिलीप ज्ञानबा नितनवरे वय 55 वर्षे रा. शेलुबाजार 9 नरेंद्र केशवराव आडोळे वय 45 वर्षे रा. शेलुबाजार 10. धम्मा सोनुने रा.नांदखेडा 11. पिंटू ऊर्फ रामेश्वर मोहळे रा. नांदखेडा 12. श्रीकांत वानखेडे रा. खामगांव याचेवर पो.स्टे. मंगरुळपीर येथे महाराष्ट्र जुगार कायदया प्रमाणे गुन्हा नोंद करुन कार्यवाही केली आहे.सदर ची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक वाशिम श्री. अनुज तारे (IPS), श्रीमती अपर पोलीस अधीक्षक वाशिम यांच्या मार्गदर्शनाने श्री. नवदीप अग्रवाल सहाय्यक पोलीस अधीक्षक उपविभाग वाशिम नेतृत्वात कार्यालयीन स्टॉप सपोनि अतुल इंगोले, पोउपनि ज्ञानेश्वर नाईकवाडे वाशिम शहर, उविपोअ कार्यालय मंगरुळपीर येथील पोहेकॉ / 747, रविद्र कातखेडे पोकॉ / 1468 अनंता डौलसे, पोकॉ/ 316 सुमीत चव्हाण व उपविपोअ कार्यालय वाशिम येथील पोहेकॉ / 379 हरिभाऊ कालापाड, पोहेकॉ / 538 अरविंद राठोड, पोकॉ / 1310 स्वप्नील शेळके, यांनी पार पाडली.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *