मिञ-मैञीणी सोबतच्या जुण्या आठवणींना दिला ऊजाळा

सिध्दार्थ विद्यालयात मिञांनी ॠणानुबंध साधत पार पडला विद्यार्थी स्नेह मेळावा

मंगरुळपीर:-१९९७ते१९९९ च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा एकत्र येत जुन्या आठवणींना उजाळा दिला. तब्बल २७ वर्षानंतर ३५ माजी विद्यार्थ्यांचा गेट टुगेदर दि.११ मे रोजी मंगरुळपीर येथील सिध्दार्थ विद्यालयात पार पडला.कार्यक्रमाचे ऊद्घाटन आमदार श्याम खोडे यांनी केले तर शाळेच्या मुख्याध्यापिका कु.किरण कांबळे,पिएसआय वाघोळे,प्रा.मनोहर बन्सोड,गटविकास अधिकारी एस.पी.पडघन,वाय सी.बिएड काॅलेजचे प्राचार्य ओमप्रकाश झिमटे,माजी शिक्षक पि.आर मनवर,मेश्राम सर,राजु सोनोने आदींनी या कार्यक्रमाला हजेरी लावली.


आपले वय, पद, प्रतिष्ठा, कामाचा व्याप बाजूला ठेवून बेचाळीशीकडे झुकलेले हे सर्व माजी विद्यार्थी अगदी उत्साहाने एकत्र जमले.सुरुवातीला शाळेची घंटा वाजवुन शाळा भरवली,सर्व माजी विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देवुन स्वागत केले.माजी शिक्षकांचा सत्कार करुन हजेरीही घेण्यात आली व तब्बल २७ वर्षाने त्यावेळच्या शिक्षकांनी शिकवलेसुध्दा.या ‘चला पुन्हा शाळा शिकुया’ उपक्रमामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. अनेक वर्षांनंतर आपण एकत्र भेटत आहोत. त्यामुळे ओळख लागते की नाही ही मनातील भावनाही होतीच; पण एकत्र आले आणि सर्वांनीच गळाभेट घेतली.२७ वर्षांपूर्वी एकत्र शिकत असलेल्या माजी विद्यार्थ्यांची पुन्हा एकदा शाळा भरली. चाळीशी ओलांडलेल्या विद्यार्थ्यांनी त्याकाळी बाकांवरच्या मित्र-मैत्रिणी सोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.शाळेतील सवंगडी, शाळेचा वर्ग, लाकडी बाक यांची आठवण प्रत्येकाच्या मनात आयुष्यभर घर करून असते. शाळा सोडल्यावर पुन्हा लाकडी बाकांवर बसण्याची इच्छा अनेकांच्या मनात वारंवार येतेच. म्हणूनच सामाजिक कार्यकर्ते फुलचंद भगत यांनी सर्व माजी विद्यार्थ्यांना शोधुन त्यांचा एक व्हाट्सअप गृप बनवला आणी सर्व मिञ एकञ यावे यासाठी कसोशीने प्रयत्न करत शेवटी दि.११ मे रोजी मैञीचे ॠणानुबंध जुळवले.आणी कल्पक संकल्पनेतुन छान मैञीचा पुन्हा योग जुळवुन आणला.यावेळी विद्यार्थ्यांशी उपस्थित शिक्षकांनी संवाद साधला आणी पुन्हा मैञीची शाळा भरवल्याबद्दल समाधानही व्यक्त केले.यावेळी सर्व माजी विद्यार्थ्यांचे सहपरिवार मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ,सन्मानचिन्ह तसेच गृपफोटो फ्रेम भेट दिली.या विद्यार्थी स्नेहमेळावा कार्यक्रमाचे सुञसंचलन ललिता गवई,वैशाली प्रधान यांनी,प्रास्ताविक अंबादास वाणी तर आभार कार्यक्रमाचे आयोजक फुलचंद भगत यांनी मानले.

विद्यार्थी स्नेहमेळाव्यातुन जपल्या सामाजीक भावना
सर्व माजी विद्यार्थ्यांना एकञ करुन हा माजी विद्यार्थी स्नेह मेळावा भरवला पण त्यावेळचा एक सवंगडी मयत झाल्याने त्याच्या पत्नी आणी परिवाराला या स्नेहमेळाव्याला निमंञीत करुन मान्यवरांच्या हस्ते साडीचोळी आणी स्मृतिचिन्ह देवून सन्मान केला तसेच नेहमी सामाजिक कार्यात तत्पर असलेल्या संत गाडगेबाबा आपत्तीनिवारण व बचाव पथकालाही गौरवचिन्ह आणी रोख रक्कम देवून माजी विद्यार्थ्यांनी सामाजीक ॠण फेडण्याचा प्रयत्न केला.सामाजीक भान जपण्याचाही प्रयत्न या ऊपक्रमाव्दारे केल्याने सर्वञ कौतुक होत आहे.

स्नेहमेळाव्यात रस आणी पुरणपोळीचा सर्वांना पाहुणचार

दि.११ रोजी सिध्दार्थ विद्यालय मंगरुळपीर येथे पार पडलेल्या माजी विद्यार्थी आणी त्यांचा परिवारासहच्या स्नेह मेळाव्यामध्ये सर्वांना आंब्याचा रस,पुरणपोळीचा पाहुणचार केल्याने माहेरपणाची आठवण झाल्याची प्रतिक्रीया सर्वांनी व्यक्त केली.सदर कार्यक्रमाची संकल्पना,नियोजन आणी सर्व माजी विद्यार्थी तसेच शिक्षकांना शोधुन त्यांना एकञ आणुन ॠणानुबंध जोडण्यासाठी महत्वाचा पुढाकार फुलचंद भगत यांनी घेतला तसेच सर्व मिञांनीही सहकार्य केले.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *