सचिन बिद्री :उमरगा

उमरगा तालुक्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १९ मान्यवरांचा ‘शांतिदूत परिवार सेवारत्न’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. शांतिदूत परिवार आयोजित रक्तदान,सहज योग ध्यान शिबिर,लाठी, दांडपट्टा, तलवारबाजी,प्रात्यक्षिके व सेवारत्न पुरस्कार प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमाला आमदार प्रवीण स्वामी, विठ्ठल साई सहकारी साखर कारखान्याचे संचालक शरण पाटील, अस्मिता गायकवाड,निवृत्त विशेष पोलिस
महानिरीक्षक डॉ.विठ्ठल जाधव आदी
मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी
शांतिदूत परिवाराच्या संस्थापक अध्यक्षा विद्याताई जाधव उपस्थित होत्या. यावेळी उमरगा तालुक्यातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १९ मान्यवरांचा शांतिदूत परिवार सेवारत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.त्यात प्रामुख्याने उमरगा पोलिस निरीक्षक अश्विनी भोसले,एस बी आय बँकेच्या व्यवस्थापिका शीतल रासकर,मुख्याध्यापक अजय गायकवाड,जकेकुरवाडी गावचे युवा सरपंच अमर सूर्यवंशी,डॉ. मंजूषा चव्हाण, मोहियोद्दीन सुलतान,अॅड. दिलीप सगर, उद्योजक अनिल सगर, शेखर अंबेकर आदींचा समावेश आहे.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा. युसुफ मुल्ला, मुख्याध्यापक पद्माकर मोरे, प्रा.जीवन जाधव, अनिल सगर यांनी परिश्रम घेतले. दरम्यान डॉ. विठ्ठल जाधव यांना ‘ग्लोबल एक्सलेन्स पुरस्कार’ जाहीर झाल्याबद्दल सपत्नीक सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *