उपविभागीय पो.अधिकारी कार्यालयीन विभागात उप.पोलीस अधिकारी उमरगा कार्यालयाचे व्दितीय क्रमांक.

धाराशिव: सचिन बिद्री
महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री 100 दिवसीय 7 कलमी कार्यालयीन सुधारणा मोहीमेच्या विभागीय स्तरावर मराठवाडयातील छत्रपती संभाजीनगर विभागा अंतर्गत पोलीस निरीक्षक कार्यालयीन विभागात उमरगा पोलीस ठाण्याने प्रथम क्रमांक व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयीन विभागात उपविभागीय पोलीस अधिकारी उमरगा कार्यालयाने व्दितीय क्रमांक पटकावुन धाराशिव पोलीस दलाची मान उंचावली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने 7 जानेवारी 2025 ते 30 एप्रिल 25 या कालावधीत मुख्यमंत्री 100 दिवसीय 7 कलमी योजना मुख्यमंत्री 100 दिवसीय 7 कलमी योजना अंतर्गत शासकीय कार्यालयात सुधारणा करण्याचे टास्क सर्व शासकीय कार्यालय यांना दिले होते. सदर 07 कलमी योजनेमध्ये पोलीस विभागांच्या कामकाजाचे अनुषंगाने (1) कार्यालयीन कामकाज व तक्रार निवारण कामकाजाचे मुल्यमापन, (2) सुकर जिवनमान, (3) स्वच्छता, (4) कार्यालयीन सोयी सुविधा, (5) क्षेत्रीय कार्यालयांना भेटी, (6) आर्थिक व औद्योगिक गुंतवणुकीस प्राधान्य, (7) अधिकारी / कर्मचारी प्रशिक्षण व नवीन कायदयाचा प्रसार व प्रसिध्दी, या उपक्रमा अंतर्गत दिलेल्या मुद्दया प्रमाणे कामकाज पुर्ण करणेबाबत टार्गेट दिलेले होते.
पोलीस ठाणे उमरगा व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय उमरगा येथील सर्व अधिकारी व अंमलदार यांनी कोणत्याही परिस्थितीत मा. मुख्यमंत्री 100 दिवसीय 07 कलमी योजने मध्ये प्रथम क्रमांक पटकविण्याचे मनात दृढनिश्चय करून सतत तीन महिने अहोरात्र कठोर परिश्रम घेवुन प्रसंगी उपाशी राहुन मुख्यमंत्री 100 दिवसीय 07 कलमी योजना कार्यालयीन सुधारणा अंतर्गत देण्यात आलेल्या सर्व टास्क मध्ये आपली उल्लेखनीय सेवा बजावली.
टास्क क्र. (1) कार्यालयीन कामकाज व तक्रार निवारण कामकाजाचे मूल्यमापन अंतर्गत डायल 112 वर आलेल्या तक्रारीच्या ठिकाणी अवघ्या 05 मिनिटात जावुन तक्रारदार यांचे अडीअडचणी जाणुन घेवुन त्यांच्या तक्रारीचे निरसन केले, तसेच मा. न्यायालयाचे आदेश हस्तगत करून गुन्हयातील जप्त मुद्देमालांपैकी 32 मुद्देमाल गुन्हयातील फिर्यादी यांना परत केले तसेच 45 मुद्देमालांची निर्गती केली, आपले सरकार पोर्टलवरील प्राप्त तक्रारीचे 100% निरसन केले.
टास्क क्र. (2) सुकर जिवनमान, अंतर्गत वरीष्ठ कार्यालयाकडुन प्राप्त 228 चारित्र्य पडताळणी अर्जाची व 105 पासपोर्टची 100% निर्गती केली.
टास्क क्र. (3) स्वच्छता अंतर्गत पो.स्टे. परिसरामध्ये वृक्षारोपण करून तसेच दगडांवर, दारू काढण्याच्या चाटुवर पेटींग करून ठिकठिकाणी लावले आहे. बगिचा तयार केला आहे. नैसर्गिक लाकडी ओंडक्याची बैठक व्यवस्था व सेल्फी पॉइंट तयार केला आहे. तसेच कार्यालयात रोपांच्या कुंडया ठेवुन मडक्यांवर व रांजणांवर वारली पेटींग केले आहेत. पो.स्टे. ची इमारत रंगरंगोटी, परिसरात डांबरीकरण व पेव्हर ब्लॉक बसवुन सुशोभीकरण करण्यात आले आहे. अस्ताव्यस्त पडलेली गुन्हयातील जप्त वाहने व्यवस्थित लावुन घेतले आहेत. पो.स्टे. येथील मुद्देमाल कक्षातील सर्व मुद्देमालाची व्यवस्थित मांडणी करून मुद्देमालाची क्यु आर कोड तयार करून ई प्रणाली मुद्देमालाची वर्गवारी केली. तसेच पो.स्टे. आवारात पक्षांसाठी घरटी व चारा-पाण्याची सोय, जनावरांना पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. झाडांना विटांचे पार बांधुन बसण्याची निसर्गरम्य सोय करण्यात आली आहे. पो.स्टे. च्या पाठीमागील व बाजुच्या परिसरात हॉलीबॉल ग्राउंड तसेच वॉकींग ट्रॅक तयार करण्यात आले असुन खेळाचे मैदान लाल माती टाकुन, रोलर करून विटा लावुन अद्यावत करण्यात आले आहे व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचे पाठीमागे टेनिस ग्राउंड तयार करण्यात आले. ठिकठिकाणी हाताने तयार करण्यात आलेल्या कचरा कुंडया ठेवण्यात आल्या आहेत. पो.स्टे. च्या आवारात पूर्वी येणाऱ्या नागरिकांसाठी बैठक व्यवस्था नव्हती. सध्या पो.स्टे. च्या आवारात ठिकठिकाणी नागरिकांसाठी बाकडे ठेवुन बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. पोलीस अधिकारी / अंमलदार व नागरिकांसाठी स्वतंत्र पार्कंग व्यवस्था करण्यात आली आहे.सुशोभीकरण करताना जास्तीत जास्त टाकाऊतून टिकाऊ वस्तुंचा वापर करण्यात आला आहे.
टास्क क्र. (4) कार्यालयीन सोयी सुविधा अंतर्गत पोलीस ठाणे येथे येणारे नागरिक, अभ्यागतासाठी वॉटर प्युरीफायर व वॉटर कुलर बसवुन स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व सुसज्ज असा अभ्यागत कक्ष, प्रसाधान गृहाची व्यवस्था केली. तसेच पो.स्टे. येथील अधिकारी व अंमलदार यांचे कक्षासमोर नामफलक, दिशादर्शक फलक, अंमलदार यांचे जॉब चार्ट लावण्यात आले. पो. स्टे. येथील प्रत्येक खोली मध्ये रोपांच्या कुंडया ठेवुन व रंगरंगोटी करून प्रसन्न वातावरण तयार केले.
टास्क क्र. (5) क्षेत्रीय कार्यालयांना भेटी अंतर्गत पो.स्टे. हद्दीतील दुरदर्शन रिले केंद्र, सौर उर्जा, पवन उर्जा प्रकल्प, 33 के.व्ही. सेंटर या प्रकल्पाना भेटी देवुन तेथील कामगार, आजु बाजुचे शेतकरी यांच्या अडी अडचणी व तक्रारीचे निरसन केले. तसेच हद्दीतील ग्रामपंचायत कार्यालय, शाळा कॉलेज, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र यांना भेटी देवुन त्यांचे अडीअडचणी जाणुन घेवुन त्यांचे कामकाजावर देखरेख केली, तसेच शाळा कॉलेज येथील विदयार्थी,विद्यार्थीनी यांचे अडी अडचणी जाणुन घेवुन त्यांचे समुपदेशन केले. शाळा कॉलेज येथे तक्रारपेटी व पोलीस काका व पोलीस दिदी यांचे मोबाईल नंबर देण्यात आले.
टास्क क्र. (6) आर्थिक व औद्योगिक गुंतवणुकीस प्राधान्य अंतर्गत प्रॉपर उमरगा शहरातील व्यापारी, सुवर्णकार, उद्योजक यांची बैठक घेवुन त्यांचे अडी अडीचणी जाणुन घेवुन निरसन करण्यात आले तसेच त्यांना चौरस्ता उमरगा व प्रॉपर उमरगा शहरात गुंतवणुक करून उदयोगधंदे चालु करणेबाबत आवाहन करून त्यांना सुरक्षेची हमी देण्यात आली. तसेच शाळा, महाविदयालय, बसस्थानक येथे सायबर गुन्हेगारी / फसवणुकी संदर्भात कार्यशाळा घेवुन जनजागृती केली.
टास्क क्र. (7) अधिकारी/ कर्मचारी प्रशिक्षण व नवीन कायदयाचा प्रसार व प्रसिध्दी या उपक्रमा अंतर्गत पो.स्टे.
येथील सर्व अधिकारी व अंमलदार यांना 03 नवीन कायदयाचे प्रशिक्षण देवुन पो.स्टे हद्दीतील सर्व शाळा,महाविदयालय
येथे तसेच पो.स्टे. येथे नागरिकांची कार्यशाळा घेवुन 03 नवीन कायदयाबाबत माहिती देवुन कायदयाचा प्रसार व प्रसिध्दी केली आहे.
अशा प्रकारे पोलीस ठाणे उमरगा व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय उमरगा येथील सर्व पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार व होमगार्ड पथक यांनी पो अधीक्षक संजय जाधव,अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना, उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शानाखाली सतत अहोरात्र न थकता अविरत काम करून मुख्यमंत्री 100 दिवसीय 7 कलमी योजना अंतर्गत दिलेल्या सर्व टास्कमधील कामकाजाची 100 % पूर्तता करून केलेल्या कामाची व्यवस्थित पीपीटी व्दारे मांडणी करून शासनास अहवाल सादर करण्यात आला. सदर उपक्रमा अंतर्गत मराठवाडयातील सर्व जिल्हयातील पोलीस ठाणे व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय येथील कामकाजाची तुलनात्मक पाहणी केल्यानंतर उमरगा पोलीस ठाण्याने प्रथम क्रमांक पटकावुन व उपविभागीय पोलीस अधिकारी उमरगा कार्यालयाने व्दितीय क्रमांक पटकावुन धाराशिव पोलीस दलाची मान उंचावली आहे.याबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.