चार महिला पीडितांची सुटका, तर चौघांपुरुषiना पोलिसानी अटक केली
(प्रतिनिधी मंगेश उराडे नागपुर)
नागपुर जिल्यातिल सावनेर परिसरातील हेटी रोडवर काहीं महिन्या पासुन सुरु असलेल्या ओयो हॉटेल गॅलेक्सी- इनमध्ये एका अल्पवयीन मुलीकडून देहव्यापार करवून घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच हॉटेलवर धाड टाकून चौघां पुरुषiना अटक केली, तर चार महिला पीडितांची सुटका केली. ही कारवाई ३१ मे रोजी सावनेर पोलिसांनी केली.
गॅलेक्सी-इन हॉटेलवर धाड टाकली असता हॉटेलचे मालक सूरज पिलाजी मिलमिले (वय 28 वर्षे),
राहणार. सातनुर ता. सौंसर, जि. पांढुर्णा (मध्यप्रदेश) हा आढळून आला. हॉटेलच्या खोल्यांची तपासणी केली
असता 3 पीडित महिला आणि एक अल्पवयीन मुलगी आढळून आल्या. तसेच अमित कोठीराम आवारी,
(वय 21 वर्षे), राहणार. सातनुर, ता सौंसर, जि. पांढुर्णा, श्रेय दिलीप जुनोनकर, रा. संतोषी माता वॉर्ड,
एम.पी ग्राऊंड ता. जि. पांढुर्णा, मध्यप्रदेश, शकील शरीफ शेख, रा. संगमसावंगा, ता. सौसर, जि. पांढुर्णा
मध्यप्रदेश तसेच एक विधिसंघर्ष ग्रस्त बालक आढळून आले.

पोलिसांनी हॉटेलच्या नोंदणी
रजिस्टरची पाहणी केली असता
त्यात कोणत्याही नोंदी मिळून आल्या
नाही. पीडित महिलांची विचारपूस
केली असता सूरज मिलमिले हा
स्वतःच्या आर्थिक फायदयाकरिता
मुलींना, महीलांना पैश्यांचे आमिष
दाखवून देहव्यापार करण्यास प्रवृत्त
करून जागा उपलब्ध करून देत
त्यांच्याकडून देहव्यापार करवून घेत
असल्याचे निष्पन्न झाले.
सूरज पिलाजी मिलमिले, अमित
कोठीराम आवारी, श्रेय दिलीप
जुनोनकर, शकील शरीफ शेख
आणि विधिसंघर्षग्रस्त बालक
यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये
गुन्हा नोंद करून 3 पीडित महिला
तसेच एका अल्पवयीन मुलीची
सुटका करण्यात आली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी चौघांनाही
अटक केली आहे. पुढ़िल तपास स्थiनीक पोलिस करीत आहे