सीएसआर अंतर्गत पर्यावरण जागृती तथा पर्यावरण संरक्षण व विविध लोकोपयोगी उपक्रम राबविण्यात आले..

नागपूर:
सावनेर येथे सेंट्रल माईन प्लॅनिंग अँड डिझाइन इन्स्टिट्यूट लिमिटेड (सीएमपीडीआय) द्वारे कोल इंडियाच्या सुवर्ण जयंती निमित्ताने कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) अंतर्गत क्षेत्रीय निदेशक मा.राजेश रल्हन यांचे निर्देशात 5 जून 2025 गुरुवारी दुपारी 3 वाजता सावनेर पंचायत समितीच्या सभागृहात जागतिक पर्यावरण दिनी पर्यावरण जागृती तथा पर्यावरण संरक्षण व लोकोपयोगी विविध उपक्रम राबविण्यात आले.
याकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सीएमपीडीआयचे मानव संसाधन विभागाचे विभागाध्यक्ष तथा महाप्रबंधक मा. संतनू श्रीवास्तव होते. प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय अधिकारी मा. संपत खलाटे, खनन विभागाचे महाप्रबंधक जीवायपी मा. रेड्डी, तहसीलदार डॉ. रवींद्र होळी, गटविकास अधिकारी माननिय.मनोज कुमार हिरुडकर आदि उपस्थित होते. सर्वप्रथम मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
यानंतर सावनेर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र ना 15 आणि जि. प. शाळा ना 15 सोलर पॅनल्स आणि 200 आंबा मोसंबी जांभुळ लिंबु आणि चिकू आदी फळाच्या वृक्षांचे वाटप विस ग्रामपंचायतला करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सी.एम.पी. डी. आय. संस्थानचे मुख्य प्रबंधक (खनन) मा श्री राजेश चौधरी, प्रबंधक (मास ) मा श्रीमती अनुराधा सिंह प्रबंधक (पर्यावरण) मा श्री प्रेम प्रकाश कुंवर, मा. मनीष राजुरकर सामान्य सहायक यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन आणि आभार प्रदर्शन मा.अनुराधा सिंह यांनी केले. प्रसंगी अधिकारी वर्ग कर्मचारी जिल्हा परिषद शाळा चेक शिक्षक आणि प्राथमिक स्वास्थ्य केंद्राचे डॉ. व कर्मचारी उपस्थित होते.
(प्रतिनिधि मंगेश उराड़े एनटीवी न्यूज़ मराठी नागपुर जिल्हा)