♦️दुचाकी चोरणारा जेरबंद..कोतवाली पोलिसांची कारवाई

अहिल्यानगर शहरातून दुचाकी चोरणारा आरोपी कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. त्याच्याकडून दोन दुचाक्या असा एकूण एक लाख पाच हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. विजय अशोक लेंडाळ (वय.२३, रा. उस्थळ दुमाला, ता. नेवासा, जि.अहिल्यानगर), असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. शहरातील भाजीपाला मार्केट परिसरातून दुचाकी चोरी करणारा आरोपी नेवासा तालुक्यातील असल्याची खात्रीशीर माहिती कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून दोन दुचाक्या हस्तगत करण्यात आल्या आहेत. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे, पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख, पोलीस अंमलदार राजेंद्र औटी, विशाल दळवी, योगेश राऊत, सूरज कदम, तानाजी पवार, दीपक रोहकले, सचिन लोळगे, दत्तात्रय कोतकर यांच्या पथकाने केली.

N Tv News Marathi🎥📷
बातम्या जाहिरातीसाठी संपर्क करा : 9028903896