CHH. SAMBHAJINAGAR | सप्टेंबर महिन्यापर्यंत जिल्हा परिषद कार्यालय नवीन इमारतीत होणार सुरू
नवीन इमारतीचे संरचनात्मक पाया मजबूत झाला असून, फिनिशिंग इलेक्ट्रिकचे काम बाकी आहे. यामध्ये शासनाकडून जी मान्यता पाहिजे होती, ती प्राप्त झाली आहे. निधी मधून उर्वरित कामे पण लवकरात करणार आहेत. यासाठी फर्निचरची बजेट मध्ये तरतूद केली आहे .2 ते 3 महिन्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण करून लवकरात लवकर सप्टेंबर मध्ये जिल्हा परिषद कार्यालय हे सुरू होईल. सप्टेंबर पर्यंत पूर्ण बिल्डिंग चे काम करून कार्यालय कार्यनिर्मित करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित पन्नू यांनी दिली आहे.
